रास्त भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांकडून होणारी भाज्या, फळे, अन्नधान्याची नासाडी कशी थांबविता येईल?

गेल्या दोन महिन्यात अनेकदा वृत्तपत्रांतून एकाच आशयाच्या पण भिन्न मथळ्यांच्या बातम्या वाचनात आल्या.

१] कोथिंबिरीला, पालेभाज्यांना रास्त भाव नसल्याने शेतकऱ्यांनी भाज्या सडू दिल्या/ रस्त्यात टाकून दिल्या.
२] टोमॅटोचे जास्त उत्पादन व कमी मागणीमुळे बाजारभाव कोसळले, टोमॅटो शेतकऱ्यांनी रस्त्यात ढिगाने टाकले.
३] पालेभाज्यांवर दंव पडल्याने आवक जास्त, उठाव कमी, बाजारभाव कोसळले, शेतकऱ्यांनी भाज्या तिथेच सडू दिल्या.
४ ] कापसाचे भाव कोसळले/ घसरले.... भाव वाढतील ह्या आशेने शेतकऱ्यांनी विक्री रोखून धरली....

या सर्व बातम्यांमधून काही गोष्टी ठळकपणे समोर येतात :

१] नियोजनातील ढिसाळपणा व भावनिश्चितीची अशाश्वती यांमुळे आपला शेतकरी कायम अडचणीत येतो.
२] योग्य ठिकाणी व योग्य प्रमाणात शीतगृहांचा व अन्नधान्य साठवणीचा पुरेसा पर्याय नसल्याने मोठे नुकसान होते.
३] जे अन्नधान्य/ भाज्या इत्यादी उत्पादन झाले आहे, परंतु योग्य किमतीअभावी टाकून दिले जात आहे तेच जर कुपोषित, गरजू लोकांच्या, मुलांच्या मुखी पडले तर ....??? हे कसे शक्य होईल? अशी कोणती यंत्रणा आहे का, जी हे घडवून आणू शकेल? किंवा असे कार्य कोणती संस्था/ व्यक्ती करत आहेत काय, जेणेकरून अशा भाज्या, फळे, धान्य वाया न जाता गरजूंच्या मुखी जातील?

.... अशी यंत्रणा अद्याप नसल्यास ती उभी करण्यासाठी काय पावले उचलावी लागतील?

आपली मते, मार्गदर्शन, सल्ला मागवत आहे.

-- अरुंधती कुलकर्णी

Sing, Dance, Meditate, Celebrate!
दुवा क्र. १