वाघाचे पुढे काय होणार?

     बाळासाहेब वृध्द झाले आहेत. बरेच नेते सेना सोडून गेले आहेत. उरलेल्यांचे खांदे थकले आहेत. उध्दवकडे पुरेसे नेतृत्व नाही. सेनेला सभ्य चेहरा मिळेल, ही अपेक्षा त्याने फोल ठरवली आहे. शाहरुखखानच्या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाने सेनेला शेवटची घरघर लागल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुका जिंकण्यासाठी सेनेकडे मुद्दे नाहीत. महाराष्ट्र राजकडे अपेक्षेने पाहत आहे.

यापुढे टिकून राहण्यासाठी सेनेने काय करायला पाहिजे?
की सेना संपल्यात जमा आहे?