फेब्रुवारी
१५
२०१०
उधाणाच्या मिषाने ही किती झाडे बहकलेली
तुला बोलावतो सागर तुला बोलावती वाटा
तुझ्या माझ्यामधे आहे किती अंतर किती लाटा...
तुझ्या माझ्या कधी झाल्या म्हणे गप्पा जिव्हाळ्याच्या
कुठे ती ऊब गेली? का असा केलास बोभाटा?
फुलांना त्रास मी नाही दिला ना बोललो काही
कशाचा दंश झाला मज? ...कुणी हा टोचला काटा..
जरा ऐकून तर घे ना म्हणे म्हणणे कुणाचे तू....
(तसे केले कधी मी तर कुणी फोडायचा फाटा?)
इथूनच बघ उद्या होतील अपुल्या वेगळ्या वाटा
दिवस लक्षात्,तू स्मरणात ,आठवणीत हा फाटा
उधाणाच्या मिषाने ही किती झाडे बहकलेली .........
ठिकठिकाणी उडाला दूर पाचोळाच उफराटा!
~सोनाली जोशी

- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
खूप आवडली
प्रे. मिताली सेठ (सोम., १५/०२/२०१० - २०:३२).
किती अंतर किती लाटा...
प्रे. सतीश वाघमारे (मंगळ., १६/०२/२०१० - १७:३४).
चांगली
प्रे. मृदुला (मंगळ., १६/०२/२०१० - १९:३७).
सुंदर
प्रे. कुमार जावडेकर (मंगळ., १६/०२/२०१० - २०:२९).
छान गझल
प्रे. गंगाधर मुटे (बुध., १७/०२/२०१० - ०१:००).
आवडली
प्रे. छाया राजे (गुरु., १८/०२/२०१० - ०७:४५).
टिप्पणी..
प्रे. मानस६ (शुक्र., २६/०२/२०१० - १२:०८).
आभार
प्रे. सुवर्णमयी (शुक्र., २६/०२/२०१० - १४:५८).