दालितोय

  • एक वाटी तूरडाळ - अगोदर अर्धा तास भिजवून
  • चार हिरव्या मिरच्या
  • चार सुक्या लाल मिरच्या
  • कढीपत्ता - एक डहाळी ( सात - आठ पाने)
  • फोडणीसाठी तेल, मोहरी
  • चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर हिंग
३० मिनिटे
दोन ते तीन माणसांसाठी

अर्धा तास अगोदर भिजवलेली तूरडाळ कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढून, मग पाच मिनिटे कुकरखालची आंच मंद करून व्यवस्थित शिजवून घ्यावी.
एका पातेल्यात ही शिजवून हाटलेली डाळ, चिरा दिलेल्या हिरव्या मिरच्या व मीठ घालून तिला गॅसवर पुन्हा एक उकळी आणावी. हवे असेल त्याप्रमाणे पाणी, मीठ घालावे. (काहीजण ही डाळ घट्ट खाणे पसंत करतात, पण ती पातळही छान लागते. )
एका पळीत तेल तापत ठेवून त्यात मोहरी, सुक्या लाल मिरच्या मोडून व कढीपत्ता घालावा. मोहरी तडतडायला हवी, कढीपत्ता करपायला नको. ही फोडणी डाळीवर घाला. चमचाभर पाण्यात हिंग विरघळवून तो हिंग ह्या वरणात घालावा. दालितोय तय्यार!

गरम गरम तूप - भाताबरोबर फर्मास लागते!

मैत्रीण