फेब्रुवारी २१ २०१०

असे काही

तुला पाहून झाले असे काही
स्पर्शून स्वप्न जावे- तसे काही

आज बोलून गेली असे काही
बोलणे संपवावे- तसे काही

चेहर्‍याची हवी ती छबी देती
चला शोधू असे आरसे काही...

मौन सोडी सखे एकदाचे हे
शब्द आणीन मी छानसे काही!

उद्या गावात होईल बोभाटा
तुझ्या गावीच नाही कसे काही ?

चढाओढीत ह्या जीवघेण्याही-
जिवाला जीव देती असे काही

कितीदा हाक देशील आयुष्या
तुला ठाऊक नाही जसे काही !

 

Post to Feed

तुला ठाऊक नाही...
वा!
नाव..
आवडली
सुंदर गझल
असे काही
बोभाटा, हाक
स्पर्शून स्वप्न जावे- तसे काही
खरंच ...
आभार
मस्त.
सुंदर कल्पना
धन्यवाद !

Typing help hide