आमचा सचिन..

आमचा सचिन ... पुन्हा एका नव्या शिखरावर! ... एकदिवसीय क्रिकेटमधील पहिला द्विशतकवीर !!
     
श्रीकृष्णही चेंडू-फळी खेळत होता म्हणे... आणि त्याने एकदा गोवर्धन करंगळीवर उचलला! आमचा सचिन ग्रेट.. पाहा, हाही चेंडू-फळी खेळतो, उच्चांकांचे नवे नवे गोवर्धन स्वतःच उभे करतो आणि तळपणाऱ्या स्वतःच्याच फळीवर लीलया पेलून धरतो... पुन्हा आणखिन् नवा गोवर्धन उभा करेपर्यंत ! शाब्बास सचिन, अभिनंदन!! 

तूं खेळत रहा.. तूं खेळत रहा.. नवनवी शिखरे आकारीत राहा !