साहित्य संमेलना निमित्त प्रतिभेचा ई आविष्कार!

८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या संमेलनाच्या संकेतस्थळाने 'प्रतिभेचा ई आविष्कार'या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

काव्यपूर्ती, उखाणे मित्रमैत्रिणींचे, चित्रावर चारोळी आणि इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द अशा या स्पर्धा असणार आहेत.

तेंव्हा आजच साहित्य संमेलन २०१०या संकेतस्थळावर जाऊन आपल्या प्रतिभेचा आविष्कार करा आणि साहित्य संमेलनामध्ये आपला ई-सहभाग नोंदवा!