मार्च १२ २०१०

तळहातावर ऊन

शुभ्र उषेची किरणें

  गेली द्यायची राहून

तळहातावर धर घट्टं

  आत मावळतीची ऊन...

पाने वारा झाली सारी

  जर्द शिशीर श्वासाने

आण पालवीची ऊब

  तूझ्या वसंत स्पर्शाने...

माझे हळवे काळीज

  लागे दिवेलागणीची चाहूल,

आता पडू दे घराकडे

  तूझे चांदण्याचे पाऊल....

तूझ्या कुशीत थांबू दे

  माझ्या शब्दांची रहाट

तूझ्या डोळ्यांनी पाहू दे

  मला उद्याची पहाट.. मला उद्याची पहाट....

Post to Feed

तूझे चांदण्याचे पाऊल...
सुंदर रचना..

Typing help hide