रॉकेटसिंग => (कॅब चालक,सगळेच...)

पॉकेट मे रॉकेट है... अस म्हणत मार्केटिंग करणारा रणबीर आठवतोय ना? पण मला मात्र हे गाणं लागलं, कि रणबीर कमी आणि आमचे कॅब चालक'च जास्त आठवतात... आणि मनातल्या मनात आपोआप ओळी बदलतात -> 'हाथ में रॉकेट है.. हाथ में..."

त्याच कारण देखिल तसचं आहे, अहो हे कॅबवाले म्हणजे सुसाट, भन्नाट, चिर्फ़ाड, म्हणजे काय एकदमच लै भारी गाडी चालवतात हो.. ( विशेषणांबद्दल सॉरीच.. पण अवधुत गुप्ते चे सततचे सारेगमप चे एपिसोड पाहून होत असं कधी कधी...) गाडी चालवत नाहीत तर उडवतात... मी तर त्यांना ड्रायव्हर म्हणतच नाही, पायलट म्हणतो पायलट !

एकदा मारुती शिकायला जात असताना माझे कोच म्हणाले होते 'ड्राईव्हिंग इस वेरी एझी... नॉट ऍट ऑल अ रॉकेट सायन्स'... हे वाक्य आणि आज स्वतः घेत असलेले अनुभव ह्यावरून असे वाटते की 'ड्राईव्हींग लाईक अ रॉकेट इस अ सायन्स/टॅक्ट :) ' & इटस नॉट ऍट ऑल एन ईझी टास्क...

शक्यतोवर मी पुढच्या सीट वर बसतो, (पहिले कारण जिवाची भीती, आणि दुसरे म्हणजे नो ऍडजस्टमेंट टेंन्शन..)त्याने काय ना समोरून/शेजारून येणारे संकट अथवा संधी ह्यावर चटकन नजर पडते...  आणि  मोटार ड्रायव्हिंग स्कुल मध्ये घेतलेले सो कॉल्ड ट्रेनिंगचे अनुभव आणि वास्तविकता ह्यातला फरक जाणवतो... आणि आपल्या अनुभवात/शिक्षणात भर'च पडते...

कधी कधी तर मला हे लोकं आधुनिक श्रीकृष्ण वाटतात...जणू आपल्या ईच्छित स्थळी पोहोचेपर्यंत ईतक्या यातना/श्रम/संकटे सोसलेला तो रथ, हे उतरताक्षणी भस्मसात होऊन जायचा..  

स्टेअरिंग हातात आले, की ह्यांच्या रक्तात कोणत्या पेशी संचारतात काही कळत नाही.... अगदी कमी प्रमाणात वापरला जाणारा हॉर्न/ब्रेक आणि डावी बाजु, उजवी बाजु, ओव्हरटेक, मिनी रिव्हर्स, ९० डिग्री टर्न, ४५ डिग्री लॅप... हे सगळे आपसुकच होत राहते... मागे बसणारा माणुस सवयीचा असेल तर ठीक, नसेल तर दर १० मिनिटाने, "भाउ, सावकाश जाऊदे बरंका, घाई नाहीये" हे वाक्य... !

आणि मराठी मध्ये भाउ, बाकी ठिकाणी भैया, आमच्या एका ड्राईव्हर ने तर माझ्या एका मराठी मैत्रीणीला सरळ तोंडावर सांगितले " मॅडम, मी पवार आहे,पुण्याचाच आहे, भैया नका म्हणू प्लिज.. ते बाहेरगावहून आल्यासराख वाटतंःD ! आता हे असे बोलल्यावर मी शेजारी बसून नुसते कसे ऐकणार...? मी त्याला मग उगीचच पकवायला लागलो.. -मस्त रे कांबळे (सॉरी पवार.. ) :D, पुण्यात कधीपासुन, कुठे राहतो वगैरे वगैरे... 

गाडी अधून मधून थोडे थोडे गचके खात चालली होती, तेवढ्यात एक काकू मध्ये आल्या... विजेच्या वेगानी आमची गाडी थोडी डावीकडे अन मग क्षणार्धात उजवीकडे नेत त्या काकुंन्ना कट मारण्याचे प्रात्यक्षिक दाखवल्यामुळे आजू बाजुच्या दुचाकीस्वारांन्नी पवारांन्ना शंकास्पद/निषेधार्थक नजरा दिल्या - "हे कॅबवाले... कॉल सेंटर/ बीपीओ वाले, वाट लावतात गाड्यांची आणि चालवणार्यांची" हा मुक संदेश देत... :D

# तो बोलत होता आणि मी थक्क झालो, औरंगाबाद मधून काँप्युटरची डिग्री घेतली होती त्याने, पण तिथे नोकरी नाही म्हणून ४ वर्षांपुर्वी पुण्यात आला, नोकरीसाठी प्रयत्न केला पण इंग्रजी आणि डेअरिंग ह्या दोन गोष्टी जमल्या नाहीत..म्हणून मग मास्टर डिग्री साठी येथे ऍडमिशन घेतली... आता नुसतेच कसे शिक्षण जमेल? त्यामुळे जमेल तो जॉब करत आहे...पैसे मिळतात , काही घरी पाठवतो, काही मी वापरतो, परत कुठे जवळपास जायच झाल तर गाडी असते'च ....

तुम्हाला लेट झाल की ओरडा बसत असेल, तसाच आमची गाडी लेट झाली की आम्हाला फाईन भरावा लागतो, म्हणून मग शक्यतो आरामात चालवता येत नाही हो, आमची खुप ईच्छा असते, पण पुण्याचं ट्रॅफिक बिनभरवशी आहे ना... त्यामुळे पिक-अप झाला कि आम्हाला वेध लागतात ते वेळेत गाडी ईन करायचे... म्हणून कधिकधी थोडी जोरात जातो, पण लोकांन्ना वाटतं आम्ही उगिच गाड्या पळावतोय, शाईनींग मारतोय...इंडीका गाडी पाहिली की कॉल सेंटरवाले..हे जणू त्यांन्नी ग्रुहीतच धरलेले असते..  ! जाउद्या आपण आपलं काम अन टाईम पहायचा बाकी जाउदे काही कुठेही.. एकंदरीत बर चालुए.. बघू आता डिग्री पूर्ण झाली की बघतो नवीन जॉब, तुमच्या ओळखीत असेल तर सांगाल का.. ?!#

अरे वा ! भारी आहेस रे, सांगेन मी नक्की... एवढं बोलून होईपर्यंत स्वारगेट सोडलं आम्ही, बी-आर-टी मुळे वाट लागलेल्या रस्त्यावरून भाई- नि एक वळणदार टर्न शिताफिने घेतला, आणि मागून वाक्य आले "प्लिज जरा हळू चालवा ना... खुप जोरात चालवताय तुम्ही..." -- इतीः स्मिता.

मी: - अगं स्मिता चील... मी आहे, काही झाल तर मी हॅंडब्रेक ओढेन...

पवारः हॅंडब्रेक चा काही तसा फायदा होत नाही सर, ते आपलं कंपनी देऊन ठेवते..  काई फार फरक पडत नाही...

मीः (घाबरुन) हो म्हणा...पण चालवणारा उत्तम असला म्हणजे झालं.. (मस्का पॉलिश).. जाउ द्या निवांतपणे..(सुचना/विनंती)

पवारः टेंशन नका घेऊ साहेब, आजपर्यंत ऍक्सिडेंट सोडा, साधा डेंट पण नाहिये गाडिवर.. :D

त्या आत्मविश्वासाचे कौतुक करून आम्ही प्रवासाच्या शेवटाला आलो, गाडी थांबली - उतरताना मी आणि स्मिता एकदमच 'थॅंक्यू म्हणालो" पण स्मिता ने सवयीप्रमाणे "थॅंक्यू भैया" म्हणून मग परत... "सॉरी थॅंक्यू मी.पवार/की पवार भाउ म्हणु?" असे म्हणत उतरली आणि आम्ही कंपनीच्या पायऱ्या चढायला लागलो...

मनात एक विचार आला, काय गरज होती एवढं बोलायची ? त्याला आणि मलाही ? असं बोलायलाच पाहिजे असा काही नियम नाही, तो काम करतोय त्याचं आणि पगार घेतोय... आपली आणि त्याची संगत केवळ एक तासाभर प्रवासाची.. पण तरीही... तरीही आपण बोलतो,  थोडे हसले, हसवले, आणि नाहीच तर किमान संभाषण होत आहे हा आनंद, आणि त्यातही आपण भाड्याच्या टैक्सीत बसून चाललोय ही भावना नसते म्हणुन, किंवा अनेक माहीती/नव्या गोष्टींची देवाण घेवाण होते... कोणाला हसवणे आपल्याला जमत नसेल तरी आपल्याशी बोलताना/वागताना समोरच्याला क्षणभर का होईना प्रसन्न वाटावे, आणि वैताग येऊ नये ही माफक अपेक्षा.. :D~

असे हे कॅबवाले, काधी सुखद तर कधी मख्ख प्रतिसाद देणारे, पण कामच्या बाबतीत सगळे सारखेच... कोठेही जायचे असो, सगळे शॉर्टकटस तोंडपाठ, आपल्या घराचा रस्ता सांगावा लागत नाही, एकदा एखाद्या माणसाचा पिक-अप किंवा ड्रॉप केला, कि ह्यांच्या मेमरी मध्ये एकदम फिट्ट !

ट्रॅव्हलिंग/ट्रान्स्पोर्ट सर्विस म्हणजे काय असते ते चांगल्या कॅब ड्राईव्हरला भेटून कळते...फ़क्त अंतरंग आणि बाह्यरंगातला वेगळेपणा... सततच्या वापराची ईंडीका आणि बरिच वर्ष उन्हात ठेवलेली न चालवलेली मर्सिडिज.. ह्यात भले कीतीही फरक असे परंतु, जोपर्यंट ऍक्सलेटर,ब्रेक,क्लच... आणि ड्राईव्हिंग सीट अबाधीत आहे तोपर्यंत पसेंजर आणि ड्राईव्हर ह्यांना जोडणारा दुवा म्हणजे त्या अर्ध्या तासातले संभाषण, एकमेकांच्या कामाबद्दल ठेवला गेलेला आदर.. आणि गाडीतल्या एफ. एम सोबत आपल्याला गुणगुणायला ऊस्फुर्त करणारी गाणी.. " ए भाय.. जरा देख के चलो...आगे ही नही पिछे भी, दाएं भी नही बाएं भी..." !