कै. सुरेश भट- श्रद्धांजली

साहित्यप्रेमी मित्रांनो,
आज १४ मार्च; गझल-सम्राट कै. सुरेश भट ह्यांचा
आज स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त त्यांना भावांजली म्हणून त्यांचीच एक गझल
सर्व काव्य-प्रेमींच्या आस्वादासाठी येथे देतो आहे.

रुणझुणत राहिलो,
किणकिणत राहिलो
जन्मभर मी तुला, 'ये' म्हणत राहिलो

सांत्वनाला
तरी, हृदय होते कुठे?
रोज माझेच मी, मन चिणत राहिलो

ऐकणारे तिथे,
दगड होते जरी
मीच वेड्यापरी, गुणगुणत राहिलो

शेवटी राहिले, घर
सुनेच्या सुने
उंबऱ्यावरच मी, तणतणत राहिलो

ऐनवेळी उभे, गाव झाले
मुके
मीच रस्त्यावरी, खणखणत राहिलो

विझत होते जरी, दीप भवतालचे,
आतल्या
आत मी, मिणमिणत राहिलो

दूर गेल्या पुन्हा, जवळच्या सावल्या
मी
जसाच्या तसा, रणरणत राहिलो

मज न ताराच तो, गवसला नेमका
अंबरापार
मी, वणवणत राहिलो

                - कै.सुरेश भट

ह्यातील
'खणखणत राहिलो' हा शेर, 'काफिया गझलेच्या सौंदर्याचा सर्वोच्च बिंदू असतो,
असे जे म्हणतात', त्याचे माझ्या मते एक उत्तम उदाहरण आहे.
                                                   
-मानस६