ब्लॉग : पैसे कमावण्याचे साधन.

ब्लॉग मधून आपण पैसे कमावू शकतो का हो??
...शकतो ना..का नाही??आणि ते ही भरपूर..

इंटरनेट वरून अथवा ब्लॉग मधून पैसे कमावण्याचे उत्तम साधन म्हणजे "जाहिरात".
कसे??
तर,
इंटरनेट वर अनेक अशा साईट्स आहेत ज्या जाहिराती पुरवितात.आपण अशा साईट्स ना
आपल्या ब्लॉग वर जाहीरात करण्यासाठी जागा द्यायची.मग साईट्स आपल्या ब्लॉग
वर जाहिरात करतात ,जेव्हा आपला एखादा वाचक ही जाहिरात वाचून त्यावर क्लिक
करतो तेव्हा त्या जाहिराती साठी आपल्याला भाडे दिले जाते.

ही पद्धत खूप उत्तम आहे आणि या मार्गे एखादा उत्तम ब्लॉगर पुरेसे पैसे कमावू शकतो.

पुरेसे म्हणजे किती रे भाऊ??
असा
प्रश्न मनात नक्की आला असेल..तर याचे उत्तर म्हणजे ५००० ते २०००० / महिना.
सुरवातीला पुरेसे नाहीत का? लाखो रुपये कमावणारे देखील लाखो लोक आहेत! पण
ते पुढे..
कोणीही कधीही फुकट काही देत नाही ,म्हणजेच त्यासाठी आपल्याला थोडे तरी कष्ट घ्यावे लागतीलच ना?

असो,
कष्ट म्हणजे काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगीनच..आधी अकाउंट तर ओपन करू...
जाहिराती पुरवणाऱ्या अनेक साईट्स आहेत..
उदा:

दुवा क्र. २

दुवा क्र. ३

या पैकी Google ad sense ही बहुतेक लोक वापरतात. AdBrite ही सुद्धा साईट उत्तम आहे.

BidVertiser ही सुद्धा वेगळ्या प्रकारच्या जाहिराती पुरविणारी साईट आहे.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे Google ad sense द्वारा कमाई करणारे सर्वात जास्त लोक भारतात आहेत!!!

चला तर मग सुरू करूया ब्लॉग मधून पैसे कमावायला..

पुढे काय करायचं ते सांगायला मी आहेच!

दुवा क्र. ४
दुवा क्र. १