मार्च १८ २०१०

गर्दीतले..

रोज आहे एकट्याने चालणे - गर्दीतले
एकट्याने चालताना - भासणे गर्दीतले

एकमेकां खेटताना, झोंबताना सोसतो-
अंतरीच्या अंतरांचे वाढणे गर्दीतले

पुण्य गाठी बांधणे आहे तसे सोपे इथे
मंदिराशी फक्त थोडे वाकणे गर्दीतले

आजही ओलावल्या डोळ्यांत होते साजरे-
माणसाला माणसाचे लाभणे गर्दीतले

संपले ते युद्ध नाही, थांबले ना प्रत्यही-
मानवाचे माधवाला शोधणे गर्दीतले

Post to Feed

आवडली...
अगदी मस्त
पुण्यात सारसबागेसमोरून
रोमांचित
सुरेख
उत्कृष्ट गझल
सुंदर...
अफाट ...
अप्रतिम
सुंदर
अंतरीच्या अंतरांचे वाढणे गर्दीतले
अप्रतिम !
अप्रतिम !
सुंदर
सहमत
धन्यवाद मंडळी ..
फारच छान!

Typing help hide