सस्नेह आमंत्रण- गझल सहयोगचा गझल मुशायरा - भेटलेली माणसे

गझल सहयोग या उपक्रमातील पुढचा गझल मुशायरा 'भेटलेली माणसे' आयोजित केला जात आहे.

मुशायऱ्याचे शीर्षक - भेटलेली माणसे

दिनांक - ३ अप्रिल २०१०

वार - शनिवार

वेळ - सायंकाळी सहा ते सव्वा आठ

स्थळ - सह्याद्री सदन, हॉटेल विश्वची गल्ली, ऑफ टिळक रोड, पुणे

संयोजन - अजय जोशी व बेफ़िकीर

--------------------------------------------------------------------------

गझलकारः

नवीन परिचय - श्री. नचिकेत जोशी उर्फ आनंदयात्री (पुणे) व डॉ. कैलास गायकवाड (नेरुळ)

बेफिकीर
श्री. अजय अनंत जोशी
श्री. अरूण कटारे
श्री. घनश्याम धेंडे
श्री. वैभव जोशी
डॉ. अनंत ढवळे

----------------------------------------------------------------------------

रूपरेषाः

*गझलकारांना व्यासपीठावर आमंत्रण (बेफ़िकीर)
*भटसाहेबांच्या दोन गझलांचे सादरीकरण बेफ़िकीर व श्री. अजय जोशी यांच्यातर्फे
* चक्री मुशायरा

मुशायऱ्यात सुरुवातीला आनंदयात्री व डॉ. कैलास यांच्या प्रत्येकी दोन गझला झाल्यानंतर इतर गझलकारांच्या प्रत्येकी चार गझला चक्री पद्धतीने होतील. एकंदर ३२ गझला सादर व्हाव्यात असा मानस आहे.  

* कार्यक्रम समाप्ती

----------------------------------------------------------------------------

गझल सहयोगच्या मुशायऱ्यासंदर्भातील अटीः

१. सर्व गझला स्वरचित, मराठी व तंत्रशुद्ध असायला हव्यात. (संदर्भ बाराखडी)
२. गझल तरन्नुम पद्धतीने सादर केल्या जाऊ नयेत.
३. कृपया सर्व गझलकारांनी आपापल्या प्रत्येकी चार गझला दुवा क्र. १ या विरोप पत्त्यावर दिनांक ३१.०३.२०१० पर्यंत पाठवाव्यात. यातील हेतू फक्त सर्व गझला एकत्रित पद्धतीने सर्वांना मुशायऱ्यात उपलब्ध व्हाव्यात इतकाच आहे. कृपया सहकार्य करावे.
४. श्री. घनश्याम धेंडे व श्री. अरुण कटारे यांच्याव्यतिरिक्त इतर सर्व गझलकारांच्या किमान दोन गझला अप्रकाशित व नवीन असाव्यात अशी अपेक्षा आहे. नवीन गझला होत राहणे हा मुशायऱ्याच्या मूळ हेतूंपैकी एक आहे.
५. या समारंभात कोणताही सत्कार, भाषण, मानधन वगैरे औपचारिकता नाही.
६. एक सामाजिक रचनांची फेरी असावी अशी अपेक्षा आहे, मात्र ही अट नाही.
७. मुशायरा रंगणे हा मूळ उद्देश असल्याने मुक्त शेरांची पेरणी, फर्माईश या गोष्टी गझलकारांवर अवलंबून आहेत. मुशायऱ्याचा क्रम केवळ सुसुत्रतेच्या उद्देशाने आहे हे नमूद व्हावे.

------------------------------------------------------------------------------------------

यावेळेसच्या मुशायऱ्याला प्रमुख आकर्षण म्हणून कोणालाही आमंत्रीत केलेले नाही. मागील मुशायऱ्यास उपस्थित असणाऱ्या व या मुशायऱ्यात नसणाऱ्या कवींनी सदिच्छाहेतू या मुशायऱ्याला रसिक म्हणून उपस्थित राहून शोभा वाढवल्यास आनंदच होईल.

-------------------------------------------------------------------------------------------

धन्यवाद!

-बेफिकीर'!

(भूषण कटककर - ९३७१० ८०३८७)