कार्तिक

आज्जी पहाटे पहाटे उठायची ...
कार्तिक स्नान महा पुण्यवान अस काही तरी
म्हणायची ....
आम्ही साखर झोपेत असताना, ती थंडगार पाण्याने अंघोळ
करायाची .....

अजुन ही आठवत आहेत ते अस्पष्ट से मन्त्र...अजुन ही
आठवत आहे ती आजीची गड़बड़....
मग झोपेतून डोळे पुसत पुसत उठलेली
आम्ही तिघ चौघ नातवंड .....ती आज्जीच्या हातातली फुलांची परडी ,त्यातल्या
२-४ उदबत्या अन् पारिजातकाच्या फुलाचा तो मंद मंद सुगंध ......

मग

काल्या
रामाच्या मदिराताल्या त्या तीन मूर्ति.... दही दूध
तुपाने माखलेल्या ......टाळ मृदुन्गाचे
स्वर.... एक सुंदरशी काकड़ आरती .......आणि इतर ५-६ आजज्या ... भाव मग्न
होउन ,तल्लीन होवून गानारया

मी : "ए आज्जी ,
दही दूध
खायाच सोडून वाया का घालवत आहेत???

विन्टी : रामच अंग दही दुधान चिकट होत असेल ना
त्याला आवडत का तस्???

चंदू : ए आज्जी , इथला राम काला ..अन् तिथला गोरा अस का???राम
नक्की काला की गोरा ???
सांग ना"
 असले हे आमचे बालिश प्रश्न ......
अन्
सगळ्याना पुरून उरणार तिच साध सोप्पा स उत्तर ....
...
...

'एक
स्मित हास्य '....
....
....
एक समाधानाचा
धन्यतेचा भाव
उभे
राहिलेले रोमांच ....आज्जी च्या डोळ्यात तरलनारे ते दोन अश्रुंचे मोती
आणि मग मंदीरच्या त्या समयीच्या अंधुक पण तरीही प्रसन्न अशा प्रकाशा सारखे भरून राहीलेले आज्जीचे शब्द ...

कल्याण करी रामराया कल्याण करी देवराया ॥
॥ जनहित विवरी ,कल्याण करी
राम राया ॥

.................................ते स्मित हास्य
तेव्हाही उलगडल नाही अजुन ही उलगडल नाही...............
...
...
आत्ता
आज्जी नाही...त्या ५-६ आजज्या ही नाहीत
तो कार्तिक ...त्यातल ते थंड
पाणी तसच ...
आजी म्हणायची तेच मन्त्र
आमचा जागे वर मात्र दुसर कोणी
तरी साखर झोपेत...
ती काकड़ आरती ........ते स्वर ..........तो
पारिजातकाचा सुगंध मात्र तसाच
काळा  राम ही तसाच ...इतकी वर्ष दुधातुपात
नाहुनही अजुन ही तितकाच काळा

पण
त्याच्या चहरया वर ही एक तसच
स्मित हास्य
अगदी तसाच तो धन्यतेचा समाधानाचा भाव
...
...
...
हे
स्मित हास्य कधी उलगडणार आहे की नाही रामच जाणे ..............

" ॥ कल्याण
करी रामराया कल्याण करी
देवराया
जनहित विवरी ,कल्याण
करी राम राया ॥ "

( हे लेखन माझ्या ब्लोगवर 

शनिवार ६ सप्टेंबर २००८

ला प्रकाशित केलेले आहे . प्रशासकनी पुनर्प्रकाशन संदर्भात मार्ग्दर्शन करावे .  )