आला उन्हाळा

नुकतेच ब्लॉग विश्वात  पाऊल टाकले आणि दुसर्याच ब्लॉग पर्यंत मजल गेली आहे.. मनोगत ची वाचत तर नेहेमीच होते पण आता लेखिका  या भूनिकेत शिरून पाहण्याचे धाडस  करते आहे.. तुमचे अभिप्राय मिळालेत तर नक्कीच हुरूप वाढेल.. आणि चुका पण काढल्यात तरी आवडेल!. नवशिक्यांना तसे हि थोड्या फार चुका करण्याची मुभा असते न..!

तर हा माझा ब्लॉग..!!

पहिल्याच ब्लॉग ला काही लोकांनी भेट दिली हे नंबर ऑफ हिटस वरून लक्षात आले! एक comment पण मिळाली! त्याबद्दल आधी आभार! ब्लॉग लिहिण्याचा वसा घेणे आणि तो पूर्णत्वास नेणे हे काही सोपे काम नाही हे हि लक्षात आले. वेळ आणि विचार आणि अर्थात इंटरनेट चे कनेक्षन या सर्व गोष्टी जुळून येणे हि कठीणच. म्हणजे दुसराच ब्लॉग आणि किती अडचणी आहेत हो ब्लॉग लिहिण्यात याचाच पाढा वाचला जातोय याची हि जाणीव होत आहेच हे लिहिताना.!
सध्या परीक्षेचा, उन्हाचा, कोकम सरबताचा आणि उसाच्या रसाचा, कोकिळेचा आणि फुललेल्या बोगन वेलींचा, गच्ची वर झोपण्याचा आणि स्कार्फ टोप्या सन कोटस आणि झालेच तर रे ब्यान चा मौसम आहे! आंबे मात्र अजून आवाक्या बाहेर आहेत.. त्यामुळे त्यांचा मौसम थोडा उशीरा ने येईल! आणि तसे हि आंबे हा विषय " आणि इतर " या परिभाषेत बसणारा नाहीच आहे. या फळांच्या राजा ला अवांतर मध्ये घेणे म्हणजे त्याचा अपमानच!
त्याला स्वतंत्र एक ब्लॉग लिहिण्याचे वचन इथे जाहीर पणे देऊन टाकते.. हो म्हणजे तो हि सुखावेल आणि आपल्या आवाक्यात लवकर येईल :-)
उन उन कित्ती केले तरी याच्यासारखा एंजोयाबल काळ परत ६ -७ महिने तरी येत नाही! परीक्षांची धामादुम असली तरी हि त्या नंतर
येणाऱ्या सुट्ट्यांच्या मोह, मुले आणि आई वडील आजी आजोबा काका मामा आत्या सर्वांनाच पडतो नाही का! पूर्वी सारखे मामाचे गाव आणि तिकडे नेणारी झुक झुक गाडी सगळ्यांच्याच नशिबी नसली तरी हि याच मौसमात नातेवाईक मंडळीची छोटी छोटी संमेलने पार पडताना दिसत असतात! म्हणजे थोडक्यात प्रचंड उन जाणवत असले तरी मौसम मात्र Lovely च आहे हे निश्चित. चला आज इतकेच.. ब्लॉग वाचणार्या सर्वाना उन्हाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!! ( happy Summer )