मी आणि भारत

त्या दिवशी मंगल मावशी घरी आली होती ..."अरे भूषण , अभिनंदन , अभिनंदन ... तुला अबक मध्ये नोकरी लागली ते कळले .. मस्तच , असाच पुढे जात राहा ...  कस काय चाललंय काम ?........ ,
बरं आणि बाहेर जयाची संधी आली तर सोडू नकोस हा ... तुम्हाला आय टी वाल्या लोकांना म्हणे तिकडे जायचे चान्सेस असतात.. जा तिकडे .. मस्त सेटल हो .. इथे काय आहे रे .. तुम्ही काय आता मोठी माणसे.. "
तिला मध्येच तोडत मी बोललो.. "अग आताशी कुठे मी  तिथे ट्रेनिंग घेतोय ..माझं काम आवडलं तर ते मला ठेवून घेणार .. आणि मी काही बाहेर वगैरे जाणार नाहीये .. जे काय करायचं आहे ते इथेच ... पुढचे पुढे बघू .. "
आमचं बोलणं संपले .. पण हा विषय काय माझ्या डोक्यातून जाईंना .. लोक आपला देश सोडून जायचा कसा विचार करू शकतात???
ह्या गोष्टीचा राग तर आला होता .. पण मी ह्या विषयावर जस्ती विचार केला नाही ...

काही दिवसांनी, एका लेखात वाचले "भारत देशासाठी काहीतरी करून दाखवावे असा देश राहिला नाही आता "..
हे वाचल्यावर मात्र तळपायाची आग मस्तकात गेली .. देशासाठी काही करावेसे वाटत नाही ? अहो मग चालते व्हा ना इथून .. कशाला राहताय ..
छत्रपतीचा पराक्रम विसरलात की काय ? भगतसिंग , राजगुरू , सुखदेव , त्यांची आहुती विसरलात ? आठवा ते देशभर अनवाणी फिरणारे गांधिजी ..टिळक आणि असे असंख्य........  त्यांचं कार्य व्यर्थ का?  .. ...
विचार करत डोळ्यात कधी अश्रू येऊन उभा राहिला ते समजलंच नाही ..

नंतर मात्र ती एक तात्कालिक प्रतिक्रिया वाटू लागली ..
आणि मग परत एकदा सुरुवात झाली ..  विचाराला.. गहन विचाराला ..

बदल ...

विचार करून वेगळेच निष्कर्ष पुढे आले ...
आत्ता आपला भारत कुठे आहे? काय काय चाललंय ?
त्या काळची परिस्थिती फार वेगळी होती.. दुसरे लोक येऊन आपल्यावर राज्य करत होते .. तेव्हा खरंच गरज होती अश्या देशसेवेची;  प्रेरणा, अत्मविशास निर्माण करायची, त्या थोर पुरुषांचे कार्य विसरणे शक्य नाही , पण आता मात्र देश खूप बदलला आहे ...
आणि हळू हळू परिस्थिती सामान्य माणसाच्या हाताबाहेर चालली आहे..
परवाच एक ग्राफिटी वाचली .. "आता जगात सर्वात स्वस्त गोष्ट म्हणजे 'मृत्यू' "..
हे बदलायचं तर आहे .. काय काय करता येईल ?..  ह्याचा पण विचार झाला ..
एका भीतींवर एक वाक्य लिहिलं होत .."If u want to change the system, u have to be the part of it " ..
इतकं सहज शक्य आहे का ? एखाद्या पक्षाचा सभासद होऊ म्हटलं.. तर आमचे पक्ष चान्गले आहेत का ? " कोणता पक्ष ? "इथपासून तयारी ... आणि जरी सभासद झालोच तर लगेच आपली हाक जाणार का ऐकायला ? आपल्या विचारांचा कोण विचार करेल ?
''झेंडा" मध्ये त्या शाखा प्रमुखाची कशी धावपळ होते ते आठवतंय .. वरचे लोक निर्णय घेणार आणि बाकीचे अहेतच धावपळ करायला ... तोड फोड करायला .. 
ज्याच्यासाठी चाल्लय तो समाज तर झोपलाच आहे .. जे करत आहेत त्यांची मरमर होतिये , कारण त्यांची संख्या खूप थोडी आहे ...
हे जीवन म्हणजे काय "नायक ", "wednesday " "my name is khan " असल्या चित्रपटानसारखे आहे का ? एक नायक येतो आणि सगळे चित्रच बदलतो ...
अस काहीतरी करायला गेलात तर बरेच लोक दुर्लक्ष करतील , काही जण स्तुती करतील आणि फार थोडे तुम्हाला मदत करतील ..
पण ह्या मूठभर लोकांच्या कार्याने काही फरक पडेल अस वाटत नाहीये..
ज्या लोकान्साठी चाल्लय  त्यांतल्या बऱ्याचा लोकांना त्याची जाणीवच नाहीये .. जे करत आहेत त्यांना हि गोष्ट कळत असून पण ते त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत ..
आणि विशेष म्हणजे .. लोकांचे स्वभाव पण इथे महत्त्वाची भूमिका बजावतात ..
रस्त्यावर थुंकण्यापासून ते भ्रष्टाचारापर्यंत... लोकाची बुद्धी ह्या राक्षसाने पोखरली आहे ..
सामान्य माणूस तर स्वतःच्या कामामध्ये गुंतला आहे .. त्याला इतर गोष्टीन्साठी वेळच नाही ..  

त्यामुळे ज्या गोष्टीमुळे प्रचंड राग आला होता - "भारत देशासाठी काहीतरी करून दाखवावे असा देश राहिला नाही आता"
आता हिच गोष्ट बरोबर वाटू लागली आहे ... देश म्हणजे काय हो  ? इथले लोकच ना ? आणि लोकच असे असतील तर कोणाला ह्या देशासाठी काहीतरी करावेसे वाटेल ? ....
मनात उरलाय तो फक्त गोंधळ .. गुंता ... विचित्र विचारांचा ...