एका लग्नाची गोष्ट

लग्न म्हटला की प्रचंड उत्सुकता,   धावपळ आणि आनंदी, सुंदर वातावरण.  खासकरुन मुलीकडे  थोडी जास्त धावपळ असते.   मुलाकडच्याचे सगळे व्यवस्थित  जाले पाहिजे,   कार्यालय, तिथली सजावट, जेवण वगैरे.  कुठेही कसूर राहतं कामा नये ह्यासाठी जीवापाड धडपड केली जाते.  थोडक्यात मुलीच्या पालकाना मानसिक ताण हा असतोच, अश्या अर्थाने की मुलाकडचे नाराज होता कामा नयेत, मान अपमान नकोत म्हणून सगळा खटाटोप.

मध्यंतरी मामेबहिणीचे लग्न झाले.  तिचे आई-वडील दोघेही डॉक्टर.  आई तब्येतीने बरीच नाजूक ,    अक्शरशहा इच्छाशक्तीच्या जोरावर लग्न पार पाडले तिने, अतिशय उत्तम रीतीने.    वडिलाने आणि भावाने कुठेही कसर सोडली नाही.    मुलाकडच्यान्चे नीट व्हावे ह्यासाठी चाललेली धडपड, तिच्या आईची तब्येत चांगली नसताना चाललेली धडपड, बहीणीच्या डोळ्यात अश्रू उभे करीत होती.

मुलाकडचे सगळे उच्चशिक्षित. मुलगा आणि त्याचे आई-वडील देव माणसे .  लग्न अगदी छान चालले होते. मध्येच मुलाच्या आजीला काय जाले कोण जाणे "पेढा दिला नाहीत वेळेवर "(खरेतर सगळे नीट दिले होते ) म्हणून ती आजी इतकी जोरात मुलीच्या वडिलावर ओरडली बाप रे बाप!!!   आजूबाजूचे लोक चकित झाले. दहा लोकान्समोर ६७ वर्षच्या म्हाताऱ्या माणसावर इतकी जोरात ओरडली  की आजूबाजूचे चार लोक हादरले.   

इतका अपमान  काहीही चुका नसताना वडिलाने गपचुप ऐकून घेतला कारण त्यांच्या मुलीच्या लग्नात त्यांना तमाशा नको होता.  मुलाचा एक मामा मुलीच्या भावावर अत्यंत उद्दट्पणे  गुरगुरला " तुम्ही पंगत ठेवलीये की नाही" विचारताना (पंगत ठेवली होती बुफे सोबत).  आता शहाण्या माणसा हे तुला नीट चांगल्या भाषेत विचारता आले असते की.

जेव्हा हे माझ्या बहिणीला कळले तेव्हा ती इतकी रडली,   सोबत तिचे आई-वडील, भाऊ ह्यांनाही अश्रू अनावर झाले.   बहीण जवळजवळ भाण्डायच्या मुड मध्ये होती पण तिला तिच्या पालकान्नी गप्प केले.   बहीण पुढचे अनेक महीने ही घटना विसरली नाही.   आपल्या लाडक्या 'पप्पान्चा"  आणि भावाचा झालेला अपमान तोही  काहीही चुका नसताना  आजच्या पिढीतली कुठलीही मुलगी सहन करणार नाही.   ते दिवस गेले जेव्हा मुलाकडचे वाटेल तसे वागायचे आणि मुलीकडचे सहन करायचे.   पण तरीही आजही असले प्रकार सर्रास होतात, ज्याचा खूप त्रास मुलीकडच्याना  होतो.

 बहिणीची एवढीच इच्छा होती की त्या आजीला तिची चुका समजावून सांगितली पाहिजे.   (आजीचे वय ७५ वर्षे आणी ही मुलाच्या आई ची आई) हे अस कारण नसताना खेकसणं बर नव्हे.   जी काही तुमची समस्या असेल ती विनयशील भाषेत सांगू शकता.

वाचकहो मला एवढेच म्हणायचे आहे  की आपण स्वतःला शिकलेले  म्हणतो मोठ मोठ्या डिग्र्या मिळवतो पण चार-चौघान्च्यात वागण्याची बोलण्याची शिस्त काही लोकामध्ये असू नये?

मुलीकडच्याचे काय हाल होतात हे मुलाकडचे कधी समजून घेणार.  मुलीच्या पालकान्ना कितीतरी प्रमाणात मानसिक ताण असतो हे  आपण कधी समजून घेणार. बर त्या मुलीचे सुद्धा काय हाल होत असतील जेव्हा तिला ह्या सगळ्यातून जावे लागत असेल.   छोट्या छोट्या गोष्टीवरून तमाशा करणं "आम्ही मुलाकडचे" म्हणजे काहीतरी फार भारी असल्यासारखा आव आणा कधी थांबणार? प्रत्येक मुलीने आपापल्या परीने, प्रसंगाची जाण ठेवून आवाज उठवलाच पाहिजे.  

तुमचे मत ह्या लेखावर मोलाचे.

धन्यवाद.

आरती जोशी