मनोगतवर स्वतःचे इंग्लिश भाषेतील साहित्य देता येईल का?

मनोगतच्या मुखपृष्ठावर लिहिल्याप्रमाणे ' ज्यांना मराठीत लिहिण्याबोलण्याची आवड आणि इच्छा आहे त्यांना मराठीतून आपले
विचार
व्यक्त करण्यासाठी, इतरांच्या लिखाणावर सूचना, अभिप्राय, टीका टिप्पणी
करण्यासाठी,
आजूबाजूला चाललेल्या घटनांवर आपली मते मराठीतून व्यक्त करण्यासाठी हे
संकेतस्थळ
उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतू आहे."  हे स्तुत्यच आहे.
तरीही काही मराठी व्यक्ती आपले  लिखाण इंग्लिशमधून करतात. अशा व्यक्तीना आपले इंग्लिशमधून लिहिलेले साहित्य ( लेख, कविता) इथे देता येईल का? यावे का? आपले काय विचार आहेत?