मुद्राराक्षसाचे विनोद (संग्रह)

प्रस्तुत आहे, मी बनवलेल्या आत्तापर्यंयच्या "मुद्राराक्षसाच्या" विनोदांचा संग्रह!!

प्रस्तावना:
पूर्वी काही मासिकांमध्ये "मुद्राराक्षसाचा विनोद" असा एक विभाग असायचा.
त्यात काही वाक्ये, बातम्यांचे मथळे असायचे आणि त्या वाक्यांमध्ये एक किंवा दोन शब्द हे मुद्दाम काना किंवा मात्रा बदलून किंवा वेगळा शब्द टाकून लिहायचे.
त्यामुळे वाक्याचा अर्थ असा काही बदलायचा की त्या वाक्याचा अर्थ एकदम विनोदी होवून जायचा.
तशीच वाक्ये मी बनवली आहेत. मूळ बातम्यांमधील व्यक्तींचा नाम-उल्लेख मुद्दाम टाळला आहे.
(कंसात दिलेले शब्द टाकल्यास मूळ वाक्य तयार होईल)
-----------------------------------------------

कामाच्या दबावामुळे एका राज्यात एका दैनिकाची गोळी झाडून आत्महत्या!
शाम रात्री जंगलातून पैसे घेवून परत येत होता तेव्हा एक मोराने बंदूकीचा धाक दाखवून त्याच्याजवळचा सगळा पैसा लुटला.
प्राणिसंग्रहालयात एका पिंजऱ्यात दोन सुंदर चोर पिसारा फुलवून नाचत होते.
भविष्य : या आठवड्यात मोठी झोप घेवू नये.
एका लाकूडतोड्याने दिवसभर लाकडे तोडून तोडून त्याची एक पोळी बनवली.
दोन-तीन आमदारांचे नृत्य म्हणजे पुर्ण राज्याची भावना नव्हे : आमदार
महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे सगळीकडे धूर आला असून, सगळीकडे मणीच मणी साचले आहे.
कॉल सेंटरच्या गाडीला झालेल्या अपघातात बघे जखमी.
"मला आयुष्यभर लोकांसाठी जागायचे आहे. -गायक म्हणाले"
सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये खांब नव्हताच!
मुंबईत लोकलचे दोन डबे पसरले.
पूर्वीच्या काळी बांधलेले दगड आणि किल्ल्या बघितल्यावर इतिहासाची साक्ष पटते.
पुणे-मुंबई महामार्गावर दरोडे कोसळले. वाहतूक विस्कळीत.
एका सदनिकेत काल दरड पडली. सहा लाखांचा ऐवज लंपास.
मॉन्सूनपूर्व पावसामुळे पुणेकर दगावले.
पुण्यातील प्रसिद्ध वडापाव खावून आम्ही सर्व आनंदाने गुप्त झालो.
काठी बसण्यापूर्वीच बाप झाडामागे तृप्त झाला.
रामाने रावणाचा मध केला व लंकावासियांना गुप्त केले.
(सैनिकाची, चोराने, मोर, झेप, मोळी, कृत्य, पूर-पाणी, तिघे, गायचे, बॉंब, घसरले, गड-किल्ले, दरड, दरोडा पडला, सुखावले, तृप्त, साप-गुप्त, वध-मुक्त)
-------------------------------------------------
दगडी चाळीत नवरा उत्सव सुरू
पुण्यात पडली धडाक्याची थंडी
खिशात मोबाईल ठेवून बोलणे पातक!
हिमाचल प्रदेशात बस दरीत मिसळली
फिल्मफेअर निवड समिती ची मादी जाहिर झाली.
सहा दोषींना काशीची रिक्षा
वाहनतळ परिसरात जुगार अड्डे सोकावले
मंत्री म्हणतात, झाले ते झाले, आता कॉफी मागा!
भारतातील युवक परदेशात गार झाला.

(नवरात्रोत्सव, कडाक्याची, घातक, कोसळली, निवड, फाशीची शिक्षा, फोफावले, माफी, ठार )
--------------------------------------------------
डॉक्टरच्या तुलनेत रुपया घसरला.
वीज कर्मचाऱ्यांचा आज भूकंप.
वीज कर्मचाऱ्यांना सात हजारांचा घोणस.
बिहारला जाणाऱ्या क्रेन रद्द.
भारताचे चांद्रयान चंद्रावर झोपले.
तीन प्रतिष्ठानांवर जायफळ अधिकाऱ्यांच्या धाडी.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सहा सुवर्णबदक!

(डॉलरच्या)(संप)(बोनस)(ट्रेन)(झेपावले)(आयकर)(सुवर्णपदक)
-----------------------------------------------------
आजकाल चाललेल्या वाईट घटना पाहता, समाजाचे मोठे नैतिक अपचन झाले आहे, असे वाटते, असेही ते म्हणाले.
दागिन्यांनी सजलेले आपले रेखीव मन ती आरशात ट्याहाळत होती.
पाकिस्तानात फक्त पंधरा मिनिटात बारा घटस्फोट, चोवीस सुखी.
ओबामांच्या हत्येचा नट उधळला.
तलाठ्यास चाळीस हजाराची काच खातांना रंगे हाथ पकडले.
अमेरिकेतील आर्थिक बंदी मुळे हजारेंचे नुकसान.
तार्किक मंदीमुळे जगभरातील अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.
रोज तीन नोकऱ्या खाणारा तो, आज जेवलाच नाही.
ओबामांच्या हत्येचा कट वितळला.
चिघळलेली परिस्थिती पाहता, तेथे विचारबंदी लागू केलेली असून, सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत कोणाही व्यक्तीला विचार करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
(अध:अतन)(तन, न्याहाळत)(स्फोट, मृत्युमुखी)(कट)(लाच)(मंदी, हजारोंचे)(आर्थिक)(भाकऱ्या)(उधळला)(संचारबंदी, संचार)
-------------------------------------------------------
अलौकीक संबंधांतून तरूणाचा खून.
हिमवृष्टीमुळे काश्मिरात परिक्षेचे वेळापत्रक कडमडले.
लहान मुलांमध्ये वाढते आहे, मधुचंद्राचे प्रमाण.
फ्लॅटचे दर ३० टक्क्यांनी नटले.
त्या वेळी मी शर्ट घालायला नको होता- एका खेळाडूची प्रतिक्रिया.
सोने घडवण्याची ताकद साहित्यिकांमध्ये- उपमुख्यमंत्र्यांचे मत.
यापुढे लग्नपत्रिकेत कुटुंबप्रमुखाचे छायाचित्र जोडणे आवश्यक असेल!
(अनैतिक, कोलमडले, मधुमेहाचे, घटले, काढायला, मने जोडण्याची, शिधापत्रिकेत)
-------------------------------------------------------
मुख्यमंत्र्यांसह ३८ मंत्र्यांचा शापविधी.
तरुणाचा नार करून खून.
एयर इंडीयाचे विमान बॉंबने उघडून देण्याची धमकी.
रोज शॉवरने आंघोळ करणे हे जाचक आहे- संशोधनाचा निष्कर्ष
मंत्र्यांची चढाओढ मसालेदार खात्यांसाठी.
मंत्र्याचा अटकपूर्व जामीन अर्ज वीटाळला.
ध्येयासाठी मसाज एकत्र केला पाहीजे.
(शपथविधी, वार, उडवून, घातक, मलईदार, फेटाळला, समाज-झाला )

----
माझ्या व्यंगचित्रांच्या ब्लॉगला जरूर भेट द्या-
दुवा क्र. १