मुलींच्या अपेक्षा

   अगदी दहाबारा वर्षापूर्वी मुलीचे लग्न जमवणे ही अवघड गोष्ट समजली जात होती. मुलांचे पालक अगदी तोऱ्यात असत. आमच्या मुलाला काय शेकडो मुली सांगून येतील असा त्याना विश्वास असे. पण आता परिस्थिती बरीच बदलली आहे म्हणजे अगदी उलट झाली आहे असे नाही, पण माझ्या परिचयातीलच बरेच पालक मुलाचे लग्न जमत नाही अशा चिंतेत असल्याचे जाणवले. बर मुलींचीही लग्न अगदी पटकन जमतात अशातला भाग नाही पण सध्या लग्नसमस्या दोन्ही बाजूने असण्याचे मुख्य कारण मुलींच्या अपेक्षा बऱ्याच वाढल्या आहेत हे आहे. पूर्वी पालक मुलींच्या अपेक्षा जाणून घेऊन त्याना योग्य ती मुरड घालून   लग्न करण्यास त्याना तयार करत पण आता तसे राहिले नाही. त्या आपल्या अपेक्षांच्या बाबतीत मुळीच तडजोड करण्यास तयार नसतात असे आढळून आले आहे‌. स्त्रीपुरुष समानतेच्या युगात मुलांच्या पालकांनी अवास्तव अपेक्षा करू नये हे जितके खरे तेवढेच मुलीनेही नवरा म्हणून अपेक्षित मुलगा आपल्यापेक्षा सर्वच बाबतीत वरचढ असायलाच हवा अशी अपेक्षा बाळगणे कितपत योग्य ? पण हल्ली मुलींना नवरा आपल्यापेक्षा अधिक शिकलेला, अधिक पगार मिळवणारा̮ ,लग्नापूर्वीच स्वतःचा फ्लॅट असणारा शिवाय घरात सर्व सुखसोयीची साधने ( म्ह. टी. व्ही., फ्रीझ , इ. ) उपलब्ध असणारा असा हवा असतो. भावी नवऱ्याचे आईवडील त्याच्याबरोबर राहणार ही गोष्ट त्याना फारशी पसंत नसते. पुण्यातील मुलीस पुण्यातलाच मुलगा हवा असतो. इतक्या घट्ट चौकटीत बसणारा मुलगा त्याना मिळणे अवघडच जाते आणि अर्थातच मुली व मुलगे दोघानाही लग्न होणे फरच अवघड हो ऊन बसले आहे. मुलींनी आपल्या या अपेक्षांना मुरड घालणे इष्ट नव्हे काय ?