'उत्सव' प्रदर्शनात मला आढळलेल्या सुरक्षिततेच्या त्रुटी

आम्ही काल "उत्सव " प्रदर्शन पाहिले . ते पाहताना तेथल्या बऱ्याच त्रुटी आढळल्या {सुरक्षिततेच्या दृष्टीने )

१. संपूर्ण छत कापडाचे होते  त्या मधून तात्पुरते electrical  वायरिंग केलेले दिसत होते .

२. बऱ्याच स्टाल मध्ये विद्युत शेगड्या होत्या म्हणजे लोड 1kw  तरी होतेच . संपूर्ण एलेक्ट्रीकॅल वायरिंग टेंपोररी प्रकारा चे होते आणि टेम्प असल्या मुळे wiring चा दर्जा काय असेल ते सांगायलाच नको .

३. त्या भुलभुलैया मधून दिवसा कसे बाहेर पडायचे ते कळत नव्हते . मग आग लागली असती आणि लाइट हि गेले असते तर काय अवस्था झाली असती ते देव च जाणे 

४. इलेक्टीकॅल / फायर ऑफिसर चे अप्रोवाल मिळवले हि असेल पण ते कसे मिळते त्याचा अनुभव मला आहे 

५.दिशादर्शक बोर्ड नव्हते , आग लागल्या वर कुठच्या दिशेने बाहेर पडायचे ते कळत नव्हते 

६. वातानुकूलित यंत्रणे मुळे आग झटकन पसरली असती आणि धुरा मुळे गुदमरायला झाले असते 

७. वीस रुपये खर्च करून हा धोका पत्करावा का? शिवाय तेथे मिळणाऱ्या वस्तू महागच होत्या ते वेगळेच 

या बाबत जाग कशी आणावी ते पुणेकर सांगू शकतील का? 

अजित गद्रे