माझी लेखमाला

माझ्या लेखावर लेख लिहीण्याचा हा दुसरा प्रसंग, मी हा लेख उघडला देखील नाही. मी प्रतिसाद उघडत नाही म्हंटल्यावर लेख तरी उघडला जाईल म्हणून हा प्रयत्न असावा

अरे नाही, हा तिसरा लेख! दुसऱ्या लेखाच्या वेळी लेखकाला तुम्ही सकस लिहा वगैरे बरंच प्रोत्साहन मिळालं पण तुमच्याकडे शब्दांशिवाय काही नाही त्यामुळे लिहीण्या पूर्वीच सगळं थांबलं! 

मला तुम्हाला एक सांगावसं वाटतं की तुम्हाला जर माझं म्हणणं पटत नसेल तर वाचू नका. तुमची बहुदा अशी पंचाईत होते की मी म्हणतो त्यानी तुमच्या धारणा चूक ठरतात आणि त्यामुळे आपण चूक आहोत असं तुम्हाला वाटायला लागतं, मग तुम्ही लेखावर-लेख, प्रदीर्घ आणि वैयक्तीक स्वरुपाचे प्रतिसाद वगैरे लिहीण्याचा उपक्रम हाती घेता.

ते असं आहेः  युद्ध सर्वथा चूक आहे हे तुम्हाला पटतं पण ते मंजूर केलं की मग तुमच्या सर्व धारणा (म्हणजे स्वधर्म, कर्मसिद्धांत, भक्तीयोग, सगुण-निर्गुण वगैरे) तपासून पाहाव्या लागणार हा धोका तुमच्या लक्षात येतो

देव ही कल्पना आहे हे तुम्ही नामंजूर करू शकत नाही पण ते नामंजूर केलं तर आपण रांगेत का उभे आहोत हा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नाही

गुरू मुळे तुम्हाला प्रत्येक उत्तरासाठी दुसऱ्याकडे बघावं लागतं, मी म्हणतो तुम्ही स्वतःच उत्तर आहात पण तुम्हाला गुरू सोडवत नाही, मग माझ्यावर शरसंधान सुरू होतं

स्त्री-पुरुष हे द्वैत आहे ही उघड गोष्ट आहे पण मग स्त्रीवादी जे आमच्यावर अन्याय झाला आणि आता कुठे आम्हाला संधी मिळाली आहे म्हणतात त्याचं काय असा प्रश्न उरतो. तुम्हाला आपण स्वतःला देह मानतो ही वस्तुस्थिती मान्य करण्यापेक्षा मी कसा चूक आहे हे दाखवण्यात धन्यता वाटते

तुम्ही मांडलेल्या मतांवर तुम्हाला उत्तरं देता येत नाहीत मग तुम्ही चर्चा कशी थांबवता येईल हे बघता.

तुम्ही एकतर माझं म्हणणं बेशर्त मान्य करा म्हणजे तुम्ही तुमच्या धारणातून मुक्त व्हाल आणि मी किती सोपं आणि उघड सांगतोय ते तुमच्या लक्षात येईल किंवा माझं वाचू नका म्हणजे तुमच्या धारणा कायम रहातील 

तुम्ही मला चूक ठरवण्यापेक्षा तुम्ही कसे बरोबर आहात हे दाखवण्याचा प्रयत्न करा ते विधायक होईल.

मी जे मांडतो ते इतकं उघड आणि स्पष्ट असतं की तिथे मतभेदाचा प्रश्नच येत नाही आणि आला तरी मी त्याचं निरसन करू शकतो.

अशा परिस्थितीत तुम्ही माझ्या लेखावर लेख लिहीण्यापेक्षा तुमचा स्वतंत्र लेख लिहा आणि त्यात मांडलेल्या मतांवर शेवट पर्यंत टिकून रहा म्हणजे त्याचा कुणाला तरी (किमान तुम्हाला तरी) उपयोग होईल

संजय