लग्न समारंभात सादर केले जाणारे गाण्याचे कार्यक्रम

हात दाखवून अवलक्षण  असे कशाला म्हणतात ... याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर एखाद्या आधुनिक लग्न समारंभात सुगम संगीताचा कार्यक्रम करण्याची गोड ( असे कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी नख शिखांत    दागिन्यांनी लदलेली  सुवासिक यजमानीण जाहीर करते)   जबाबदारी  घेऊन पाहावी.     एक तर .लग्न समारंभात कोणतेच काम नियोजित वेळेवर होते हे पाहणे आपल्या प्रथेत बसत नाही. शिवाय गाणे आयोजित केले असा आधुनिक आव आणला तरी त्यास वेळ मिळावा म्हणून विधी सन्स्कार कर णारा पारंपरिक ( आणि पापभीरू.. )  यजमान भटजी मंडळींच्या मन मानी  अफाट टाइम सेन्सला आळा घालू शकतं नाही. ते देखिल कधीतरीच मिळणाऱ्या या न्युसन्स  व्हॅल्यू  चा पुरेपूर  फायदा घेत कार्यक्रमच वेळेवर आक्रमण करितं राहतात. सरते शेवटी ... चुकून उशिरा आलेले चार दोन पाहुणे आणि गोड गाण्यापेक्षा गोड पदार्थात साहजिकच अधिक रुची असलेल्या जाण कार लोकां समोर मोरू झालेला आपला वाद्यवृंद कशीबशी दोन गाण्यांची बुंदी पाडतो ..... हे अनुभवल्या नंतर मला पडलेले काही सवाल  येणेप्रमाणे :

जर गाणे या प्रकाराचा आब राखता येणार नाही अशी परिस्थिती असेल तरीही "आम्ही बाई कित्ती रसिक " हे दाखवण्यासाठी  गाणे ठेवण्याची हि त्रास दायक  फॅशन मराठी माणसात केव्हा सुरू झाली ?

समोर गाणे चालू असताना आरामात गाव्गप्पा हाणितं हास्य विनोद करत राहणे ... निर्विकार मनाने खाद्य पदार्थ चेपत राहणे हि कलेप्रती बेदरकारी  आपल्यात ( मराठी मनात..... ) कशी आली?