बटाटे, कांदे, लसूण, मिरची, कोथिंबीर, लिंबू, मीठ व साखर (सारण बनवण्यासाठी)
बारीक चिरलेला लेट्युस
बारीक चिरलेली काकडी
सालसा
किसलेले चीझ
मीठ व साखर चवीपुरते
शेंदरी रंगाच्या गाजराचे बारीक गोल काप साले काढून(सजावटीसाठी)
पालकाची छोटी पाने (सजावटीसाठी)
१५ मिनिटे
ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात
बटाट्याचे सारण: बटाटे उकडून, त्याची साले काढून कुस्करून घ्यावेत. त्यात कांदा, लसूण पाकळ्या, मिरच्या व कोथिंबीर खूप बारीक चिरून घाला, लिंबू पिळावे. चवीपुरते मीठ व साखर घाला व ह्या सर्व मिश्रणाचा लगदा करावा. हे बटाट्याचे सारण तसेच कच्चे राहू देत.
सर्वात आधी एका डीशमध्ये गाजराचे गोल व बारीक काप ठेवा. मध्यावर पालकाची पाने लावून घ्या. मग त्यावर एकेक टोर्टिया चिप्स ठेवा. नंतर प्रत्येक चिप्स मध्ये सर्वात आधी बटाट्याचे सारण घाला. नंतर चिरलेला लेट्युस व काकडी घाला. नंतर सालसा व सर्वात शेवटी किसलेले चीझ घाला. चवीसाठी थोडे मीठ व साखर पेरा. अशी ही एक छान सजलेली चमचमीत डीश तयार होईल.
नाहीत.
स्वानुभव
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.