तिबेटियन "मोमो"

  • आवडत्या भाज्या
  • अजिनोमोटो
  • गव्हाचे पीठ/मैदा
  • मीठ
  • तिखट
  • आले
  • हिरव्या मिरच्या
  • तेल
४५ मिनिटे
कितीही

हा पदार्थ तिबेटियन आहे, नाव आहे "मोमो".
ह्याला आपल्याकडील मोदकाचा भाऊ म्हणता येईल.
कृती ही संपूर्णपणे मोदकाचीच, फक्त सारण म्हणून आपण यात एकतर किसलेल्या किंवा बारीक चिरलेल्या आपल्याला आवडणाऱ्या भाज्या घालू शकतो (किंवा मग चिकन, मटन किंवा माश्याचे बारीक तुकडे घालता येतील. हे  भाज्यांबरोबरच घालावेत.)हे मोमो सपकही असतात किंवा तिखटही असतात.दोन्ही प्रकारच्या मोमोत (सपक आणि तिखट) सारणात थोडेसे अजिनोमोटो आणि मीठ(अर्थात
चवीपुरते) घालावे.
त्यानंतर, हे मोदक तळून किंवा उकडून घावेत.सपक प्रकार सॉस किंवा केचपबरोबर खायला द्यावा. तिखट प्रकार तसाच खाता येईल.
( तिखट मोमोसाठी चिरलेल्या भाज्यांबरोबर हिरव्या मिरच्यांचा ठेचा आणि आलं घालावं लागेल.)

कृष्णकुमार द. जोशी
महेश मूग.


बाकी यात गृहिणी स्वतः काही प्रयोग करू शकतात.

माझे सहकारी प्रा. महेश मूग