कोण?

कोण?

स्वत:च्या मर्जीने असं, तुटलं आहे कोण?
काळाचा डींक लाऊन मग, जुडलं आहे कोण?

तुटतात ते मुखवटे कृत्रिम, देवापुढे लपू शकलं आहे कोण?
कवचं किती क्षणभंगूर, आतल्या माणसाला तोडू शकलं आहे कोण?

गेलेल्या सुखद काळाला, परत आणू शकलं आहे कोण?
विसरण्याऐवजी भूतकाळाला, आठवून रडलं आहे कोण?

तू विचारतेस या जगात तुझं, उरलं आहे कोण?
मी म्हणतो मी आहे, तुला अजून कशाला हवं आहे कोण?

मी विचारतो मनाला, अरे रडतं आहे कोण?
मन म्हणतं, असं विचार की लढतं आहे कोण?

हात धरून बाजूला चालतं आहे कोण?
हात सोडून पाठच्यापाठी पडतं आहे कोण?

सोनेरी अश्रुंवरून कळतं, आतल्या गरिबीमुळे रिक्त आहे कोण?
हसत भोगणाऱ्यांकडून कळतं, साखळ्यांतही मुक्त आहे कोण?

-- मयुरेश कुलकर्णी