आपले मत काय?

पराग आणि पल्लवी यांचा घटस्फोट दोन वर्षाच्या आतच झाला. सासूचा जाच आणि नवरा त्याच्या आईचे ऐकणार. घरगुती भांडणात परागने तिच्या थोबाडीत दिली. त्यावेळी पल्लवी आठ महिन्यांची गर्भवती असताना माहेरी गेली ती परत आलीच नाही.
मुलगा झाल्याचे पल्लवीच्या घरच्यांनी परागला कळवले. पण परागच्या आईने त्याला मुलाला बघायला जाऊ दिले नाही. कारण पल्लवीने स्वतः मुलाला घेऊन सासरी परत यावे अशी सासूची अट. पल्लवीच्या घरुन घटस्फोटाची नोटिस आली. घटस्फोट झाला. पल्लवीला पोटगी मिळाली नाही. ठराविक रक्कम परागने मुलाच्या नावे दिली आहे जी मुलाला सद्न्यान झाल्यावर मिळणार आहे. 
पल्लवी स्वतः नोकरी करून मुलाचे संगोपन करते. आज ती आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका निभावते. मुलगा आज सात वर्षांचा झाला आहे. पल्लवीला आता दुसरे लग्न करायचे आहे. आणि दुसऱ्या नवऱ्याला मुलाचे कायदेशीर पालकत्व द्यायचे आहे. यासाठी पल्लवीने परागला मूल दत्तक देण्याची परवानगी मागितली आहे. 
परागने मुलाला दत्तक देण्यास परवानगी देण्यास नकार द्यावा आणि मुलास परत मागवे का?
परागने मुलाला दत्तक देण्यास परवानगी देण्यास होकार द्यावा का?