"ध चा म" च्या कथेची माहिती

मराठीत एक वाक्प्रचार आहे "ध चा म करणे". माझ्या पुसटशा माहिती नुसार या वाक्प्रचाराचा उगम हा पेशव्यांशी संबंधीत आहे. मला त्या कथेबद्दल अधिक माहिती हवी आहे. जर कुणाला त्याबद्दल माहिती असेल (मला खात्री आहे कि असे बरेच मनोगती असतील) तर त्यांनी कृपया येथे द्यावी.

धन्यवाद!

(अवांतर : हा माझा मराठी टंकनाचा पहिलाच अनुभव. ही २ वाक्य लिहायला मला १५ मिनिटे लागलीत. धन्य ते मनोगती जे प्रचंड मोठ्या कथा वगैरे टंकतात.)