जुलै २० २०१०

प्रकटन

आपले सहप्रवासी, सदस्य भोचक म्हणजेच अभिनय कुलकर्णी याचे आज पहाटे धुळे येथे एका अपघातात निधन झाले.
अभिनय, त्याची पत्नी भाग्यश्री कुलकर्णी मुलीसह इंदूरहून मुंबईला निघाले होते. त्यांच्या बसला धुळ्यात पारोळा रस्ता चौफुलीवर नागपूरहून येणारी एक ट्रक आदळली. अभिनय बसला होता त्या आणि त्याच्या पुढच्या-मागच्या खिडक्यांच्या भागातच ट्रक आदळल्याने या अपघातात चार जण मृत्यू पावले. त्यात अभिनयचा समावेश आहे. भाग्यश्री आणि मुलगी अपघातातून बचावले.
तूर्त प्राप्त माहितीप्रमाणे, धुळ्यातील सोपस्कार उरकले जात आहेत. तेथे या कुटुंबाला आवश्यक ती मदत मिळाली आहे. माझे भाग्यश्रीशी बोलणे झाले त्यानुसार या मुलीने धीर राखला आहे.

Post to Feedफार वाईट झाले
मृतात्म्यास शांती लाभो
अरेरे
सुन्न झालो.
काय बोलावे अशा वेळी.......
भयंकर बातमी
दुःखद घटना
अभिनय नव्हता हा. सच्चेपणा होता
दुःखद घटना
अकालीं गेले. दुःखांत सहभागी आहे.
अपघाती मरण नको.
सुन्न करणारी घटना...
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो
वाईट झाले
फार
दु:खद घटना

Typing help hide