नवीन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्राच्या सहिष्णुतेचा
गैरफायदा घेत अनेक परकीयांनी, (त्यात देशांतर्गत सुद्धा आले) अनेक आक्रमणे
केली. आजच्या लोकशाहीत महाराष्ट्रावर शेजारच्या  राज्यांकडून होणारे
अत्याचार, वेगवेगळ्या प्रकारे येणारे दबाव, त्याही काळात दिल्लीचेच महत्त्व
आणी आजही  दिल्लीचेच महत्त्व. कर्नाटक असो किंवा चंद्राबाबू असोत यांची
दंडेली हे वेगळ्या अर्थाने परकीयांचेच आक्रमण समजावे काय? 

मला वाटते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आक्रमणे होत त्यावेळी जनतेस
वेठीस धरले जाई, सैन्यास अतिरिक्त भार सहन करावा लागे. शासनव्यवस्था डळमळीत
होई, सरकार व जनते मध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन नैराश्य, उद्वेग
अशा विविक्षित प्रतिक्रिया निर्माण होण्यास अशी आक्रमणे कारणीभूत झालेली
आहेत. आजही तेच होते आहे असे वाटते का?