फणसाचे रायते

  • भाजीचा फणस चिरुन, उकडून ४ वाट्या
  • घट्ट दही - ४ वाट्या (अर्धा तास टांगून घट्ट करावे)
  • मीठ - चविपुरते
  • साखर - चिमुटभर
  • फोडणिसाठी तेल किंवा तुप - ३ चमचे
  • जिरे - १ चमचा
  • हिरव्या मिरच्या - २-३ (चविप्रमाणे)
  • कोथिंबिर - थोडी - (चिरून घेणे)
३० मिनिटे
चार जणांसाठी

१. उकडलेला फणस कुस्करून घेणे (गरम असतानाच कुस्करून घेणे - सोपे जाते)

२. घट्ट दही घोटून घेणे

३. कुस्करलेल्या (गार झालेल्या) फणसात दही, चवुपुरते मीठ, चिमुटभर साखर घालून व्यवस्थीत मिसळणे

४. आता जिरे - मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करून रायत्यात मिसळणे

५. सर्व जिन्नस नीट मिसळून झाल्यावर कोथिंबिर घालून सजवणे - फिज मध्ये ठेवून थंड करून आस्वाद घेणे

हे रायते उपवासाला चालते.

याच पद्धतीने पडवळाचे, तोंडल्यांचे, शिराळ्याचे (शिरा काढून, फोडी शिजवून), सुरणाचे (परत उपवासाचे! ) अश्या  अनेक भाज्यांचे रायते होउ शकते. आवडी प्रमाणे फोडणीत लाल मिरच्यांचे तुकडे वा मिरची पुड, तसेच हिंग घालून पाहा.... निरनिराळे प्रयोग करून पाहा.

माझी आई