अमेरिकन कट्टा

मनोगतीहो,


मुंबई कट्ट्याचे रसभरित वर्णन ऐकून इथल्या उत्तर अमेरिका-खंडामध्ये राहणाऱ्या मनोगतींना पण एकत्र येता येईल का? असा विचार सुरु झाला आहे. 


त्या करता पहिल्यांदा अमेरिकेत कोण आणि कुठे राहतात ते माहिती करायला पाहिजे.  त्याकरता अशा मनोगतींना त्यांनी त्यांची माहिती मला व्यक्तिगत निरोपातून कळवावी अशी मी इथे जाहिर विनंति करीत आहे.


जास्तीत जास्त मनोगती पुढे आले तर सर्व एकत्र कुठे भेटू शकतो ते ठरवता येईल.  आपल्यात उत्साही मनोगति खूप आहेत.  त्यांनी पुढाकार घेतला तर असा कट्टा किंवा मेळावा भरवणे सहज शक्य आहे.  सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यापण आहेत, हवा चांगली आहे, तेव्हा आपण अमेरिकावासी एकत्र येऊ शकू.  तर मग या तर उत्सहाने पुढे.


तसेच भारतातून अमेरिका भेटीला येणाऱ्या मनोगतींनापण हे आमंत्रण आहे हो.


आपला,
सुभाष