झी मराठी सारेगमप लिटिल चँप्स : चांगले गायक नकोच आहेत का?

झी मराठी लिटिल चँप्स सुरू झाले आहे. बरेच जण ते पाहत देखील असतील. पण, आतल्या गोष्टींचा विचार कोण करते? या वेळी तर उघडपणे दिसते आहे की चांगले बालगायक नकोच आहेत.

पहा,
सोमवारच्या भागातले गायक आणि मंगळवारच्या भागातले गायक यांच्यात मुळातच फरक होता. त्यामुळे त्यातल्यात्यात असणाऱ्या ७ गायकांपैकी ५ निवडले गेले सोमवारी.

सोमवारचा भाग

आणि मंगळवारी जवळपास चांगले गायन करणारेच सर्व ७ जण होते. त्यातील दोन काढले. पहिल्याच भागात चांगले स्पर्धक काढण्याचा हा डाव की चूक? ज्या मुलाला परीक्षकांकडून 'ध' पर्यंत गूण मिळाले होते तो बाहेर आणि ज्या स्पर्धकाला 'प' पर्यंत गूण मिळाले तो आत?

मंगळवारचा भाग

कोणाला आत ठेवायचे व कोणाला बाहेर काढायचे हे खरोखरच परीक्षकांच्या हातात आहे की अन्य कुणाच्या?

झी मराठीला चांगले बालगायक नकोच आहेत का?

एकंदरीतच यावेळी झी मराठीवर संगीत क्षेत्रातील लोक नाराज आहेत. आता, चांगल्या बालगायकांना हिरमुसले करून, त्यांच्यावर उघडपणे अन्याय करून झी मराठी काय साधणार आहे?