१ २ ३ ४ नारळ बर्फ़ी

  • १ वाटी तुप
  • २ वाटया ओल्या नारळाचा चव
  • ३ वाटया साखर
  • ४ वाटया फ़ुल क्रिम दुध
  • जायफ़ळ पुड आवडीप्रमाणे
  • वेलची पुड आवडीप्रमाणे
  • मिठ चिमुटभर
४५ मिनिटे
४ ते ५
  1. १ वाटी तूप, २ वाट्या नारळाचा चव, ३ वाट्या साखर, ४ वाट्या दूध व चिमुट मिठ हे सर्व साहित्य जाड बुडाच्या कडईत एकत्र करून गॅसवर शिजत ठेवावे.
  2. मिश्रण घट्ट होईस्तोवर सतत ढवळत राहावे. शेवटी शेवटी चांगला परता खाली लागून देऊ नका.
  3. हे मिश्रण हातावर फार उडते त्यामुळे मिश्रण हलविण्यासाठी मोठा व लांब डाव वापरा.
  4. मिश्रण घट्ट होत आले कि जायफ़ळ व वेलची पुड घाला. शेवटी मंद गॅसवर परता. लालसर रंग येइसतो पर्यंत.
  5. आता जास्त वेळ घालवु नका नाहितर करपेल.   
  6. एका तूप लावलेल्या ताटलीत किंवा ऍल्युमिनिअम च्या ट्रे मध्ये हे मिश्रण ओतावे. ट्रे जरा आपटून घ्यावा जणे करून सारण छान एकसारखे पसरेल. वाटल्यास वरुन जाड प्लॅस्टीक चा कागद ठेऊन थोडेसे वाटिने पसरवावे. कागद काढुन घ्यावा.
  7. ५ ते १० मिनिट गार करून घ्या. मग वडया पाडा.
  • केरळ मध्ये हा बर्फीचा प्रकार केला जातो. हि बर्फी करताना प्रमाण फार महत्वाच आहे. प्रमाण चुकले तर चवीत फरक पडतो.
  • १ २ ३ ४ हे नावं या करिता दिले आहे की प्रमाण लक्षात राहावं. १ वाटी तूप /२ वाट्या नारळ /  ३ वाट्या साखर / ४ वाट्या दूध
  • हि वडी रंगाने तांबुससर होते. पण एकदम खुसखुशीत होते. खाताना मज्जा येते.
  • आवडत असल्यास सारण गरम असताना वरुन चांदिचा वर्ख हि लावू शकता.
  • नेहमीच्या पांढरे वडी पेक्षा या वेळेस तुमच्या भावाला नारळी पौर्णिमेला वेगळी बर्फी खायला घाला.

सर्वांना राखी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

मिडिया