मठरी

  • १ कप मैदा
  • १ कप रवा
  • १/२ कप वनस्पती तुप
  • २ टि. स्पून ओवा किंवा जिरे
  • १ टि. स्पून अर्धवट कुटलेले मिरे
  • मिठ चविनुसार
  • दुध
  • कोमट पाणी
  • तळण्यासाठी तेल किंवा वनस्पती तुप
१ तास
  1. मैदा, रवा, मिठ, मिरे, जिरे, ओवा आणि वनस्पती तुप एकत्र मिक्स करा. हाताने चांगले एकत्र करा. ब्रेड क्रम्स प्रमाणे त्याचे स्वरूप होयला पाहिजे.
  2. आता दुध आणि पाणी मिक्स करून त्याची घट्ट कणिक मळून घ्या. १५ ते २० मिनिटे चांगले मळा व  पुढची २० मिनिटे झाकून बाजुला ठेवा.
  3. २० मिनिटे झाल्यावर तयार कणिकेच्या जाड पुरी लाटून घ्या. या पुरिंना काट्याने किंवा सुरिने टोचे मारून सोनेरी रंगावर तेलात किंवा तुपात तळून घ्या.

                           

  • या मठरी चहा बरोबर मस्त लागतात.
  • प्रवासा मध्ये नेण्यास उपयोगी आहेत.
कै. आजी