कॉफी केक

  • २५० ग्राम बटर/मार्गारीन
  • २०० ग्राम साखर
  • ४ अंडी
  • १५० ग्राम मैदा + १५० ग्राम स्पाइझं स्टेर्क/ आरारुट
  • ३ चमचे बेकिंग पावडर
  • १ चमचा वॅनिला अर्क
  • ४ चहाचे चमचे कॉफी+ २ चहाचे चमचे कोको + २ चमचे रम (ऑप्शनल)
  • २ मोठे चमचे दूध
  • सजावटीसाठी २ चमचे किसलेले व्हाइट चॉकलेट
१ तास
साधारण २० तुकडे

बटर फेटून घेणे, साखर घालून भरपूर फेटणे. अंडी घालून भरपूर फेटणे. मैदा+ आरारुट+ बेकिंग पावडर घालणे व फेटणे. दूध घालून थोडेसे फेटून मिश्रण एकजीव होईल असे पाहणे.
ह्या मिश्रणाचे १/३ आणि २/३ असे दोन भाग करून वेगवेगळ्या भांड्यात काढून घेणे.
१/३ भागात वॅनिला अर्क घालणे व ढवळणे. दुसऱ्या भागात म्हणजे २/३ भागात कोको+कॉफी +रम घालणे आणि ढवळणे.
केक मोल्डला बटर लावून घेणे. दोन-तीन चमचे वॅनिला घातलेले केकचे मिश्रण, दोन-तीन चमचे कोकोवाले मिश्रण असे करत सर्व मिश्रण घालणे.
१८० अंश से ला ३० ते ३५ मिनिटे बेक करणे. केक झाला की नाही ते विणायची सुई किवा सुरी त्याच्या पोटात खुपसून पाहणे.
मिश्रण न चिकटता सुरी बाहेर आली म्हणजे केक झाला. साधारण ५ मिनिटे अवनमध्येच राहू देणे.
नंतर केक मोल्डमधून काढून जाळीवर घालणे. गार झाल्यावर गार्निशिंगसाठी व्हाईट चॉकलेट किसून घालणे.
कॉफीबरोबर आस्वाद घेणे :)

कोणताही केक गार झाल्यावर तुकडे करणे.