शास्त्रज्ञ आणि अध्यात्म!

‘दि ग्रँड डिझाईन’ या पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणाऱ्या स्टीफन हॉकिंग यांच्या पुस्तकातील निरीक्षणं 'याहू'वर ३ सप्टेंबरला प्रसिद्ध झाली आहेत, ती अशी:

१) देवानं हे अस्तित्व घडवलं नाही, ‘बिग बँग’ हा पदार्थविज्ञानाच्या नियमांचा अनिवार्य परिणाम होता.

२) गुरुत्वाकर्षणा सारखे नियम असल्यामुळे अस्तित्व स्वतःला शून्यातून निर्माण करू शकतं आणि करेल.

स्वयंप्रेरित निर्मिती हे काहीही नसण्या ऐवजी काहीतरी असण्याचं; आणि अस्तित्व आणि आपल्या असण्याचं कारण आहे

३) जगाच्या निर्मिती आणि चलनासाठी देवाची गरज नाही

४) त्यांनी त्यांची ‘अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम’ (१९८८) मधली आधी केलेली विधानं मागे घेतली. ती अशी होती:

अ) पदार्थविज्ञानाचा नियम म्हणजे देवाने ‘बिग बँग’ मध्ये हस्तक्षेप केला असेल असं मानण्याची गरज नाही

ब) जर आपण पूर्ण सिद्धांत शोधू शकलो तर तो मानवी बुद्धीचा अंतिम विजय होईल कारण मग आपण देवाचं मन जाणू शकू

५) त्यांनी असं म्हटलं आहे की एक ग्रह सूर्य सोडून दुसऱ्या ताऱ्याभोवती फिरतो आहे, या १९९२ मध्ये लागलेल्या शोधाने, न्यूटनच्या: ‘अस्तित्व अनाकलनीय कल्लोळातून (केऑस) निर्माण झाले नसून ते देवाने निर्माण केले आहे’ या कल्पनेचा पुनर्विचार करायला मदत झाली.

६) या सर्वामुळे योगायोगाने निर्माण झालेल्या आपल्या ग्रहस्थितीचा-म्हणजे एक सूर्य, पृथ्वी-सूर्य यांच्या मधलं नेमकं अंतर, सूर्याचं वस्तुमान या बाबी पृथ्वी ही मानवाच्या आनंदासाठी कौशल्यपूर्ण रीतीने निर्माण केली गेली याचा पुरावा मानण्यासाठी अनिवार्य आणि दखल घ्याव्या अशा ठरू शकत नाहीत.  

स्टीफन हॉकिंग यांची ही निरीक्षणं अध्यात्माच्या किती जवळ जातात आणि विज्ञान आणि आध्यात्मिक प्रक्रिया कशा समांतर आहेत हे मला सांगावंसं वाटतं.  

संजय