पैसा

पैसा या ‘वेड लावी जीवा’ अशा विषयावर मी लिहिणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊटंटसनी माझा ‘स्पिरिच्युऍलिटी फॉर सीएज्’ हा लेख त्यांच्या जर्नलसाठी स्वीकारला आहे.
 
ओशोंनी म्हटलं आहे की माणसं जवळजवळ सगळं आयुष्य ‘वेळेचा पैसा करणं या एकमेव उपक्रमात घालवतात’. या अनुषंगाने येणारे मुद्दे असे आहेत:

१) माणसाच्या दिवसाची सुरुवात आणि जीवनाची दिशा ही पैसा मिळवायचा या उद्देशानेच होते का? ही दिशा केव्हा आणि कशी बदलता येईल?

२) पैसा ही मानवी सोयीसाठी निर्माण झालेली कल्पना आहे पण मानवी मनावर तिचा इतका पगडा का आहे?

३) पैशाशिवाय आयुष्य ही व्यर्थ कल्पना आहे कारण तसं होणं शक्य नाही, पण आवश्यक तेवढा पैसा असून देखील लोक पैशाच्या मागे का आहेत?

४) पैसा कसा मिळवावा हा या चर्चेचा हेतू नाही पण असं काही करता येईल का की ज्याने पैसा देणाऱ्याला देखील तो घेणाऱ्या इतकाच आनंद होईल?

संजय