शरद पवार विनाकारण वादग्रस्त राजकारणी...मेडिया जबाबदार

सध्या महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी आणि संवेदनशील नेत्याच्या मागे मेडियाचे शुक्लकाष्ठ लागले आहे.शरद पवारसाहेबांवर केलेले काही गंभीर आरोप म्हणजे..१) दाउदला भारताबाहेर जाण्यास मदत. २) भुखंड प्रकरण ३)आय. पी. एल मध्ये असलेला हिस्सा, गुंतवणूक.

४) आय‌. सी. सी. चे अध्यक्षपद ५) लवासा प्रकल्पात पवार कुटुंबाची गुंतवणूक ६) कृषीमंत्रीपद भूषविताना आलेल्या नाना अडचणी.
मुळात साहेब कमी बोलतात, त्यात तब्येत ठीक नसताना पण त्यांची चालू असलेली ओढाताण मेडीयाच्या नजरेस येत नाही हे साहेबांचे दुर्दैव म्हणायचे.साहेबांच्या संपत्तीबद्दल पण काही महाभाग उगाचच च्यावच्याव करत असतात.त्यांनी म्हणे स्विस बँकेमध्ये पैसा ठेवल्याच्या वावड्या मध्ये उठल्या होत्या आणि त्याही शांत झाल्या.मुद्दा हा आहे की पवारसाहेब खरंच एवढे भ्रष्ट आहेत का? माझ्यामते त्यांच्याइतका साधा राजकारणी नसावा.खरे म्हणजे शरद पवार हे व्यक्तिमत्त्व आपल्याला समजलेले नाही हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल.माझे म्हणणे एवढेच आहे की पवारांसारख्या मुरब्बी नेत्यावर आरोप करतांना मेडियाने काळजी घेणे गरजेचे आहे.आरोप केले तर ते पुराव्यांसहित स्पष्ट करावे नाहीतर गप्प बसावे.