आजच्या युगात मौंजेची आवश्यकता आहे काय ?

मौंज किंवा व्रतबंधाची आजच्या युगात आवश्यकता आहे का? मी ब्राह्मण कुळात जन्माला आलो. माझी मौंज खूप धूमधडाक्यात वयाच्या दहाव्या वर्षी झाली. कालांतराने लग्न झाले. दोन मुले झाली. आता त्यांची मौंज कर, म्हणून नातेवाईक, मित्रमंडळी मागे लागतात. दर उन्हाळ्यात सार्वजनिक व्रतबंध सोहळे पार पडतात, तेव्हा उरकून टाक म्हणतात. कोणी तीर्थक्षेत्री जावून करून या म्हणतात. न मागता फुकटचा सल्ला देणारे भरपूर भेटतात. पण एकही जण मौंज करण्याची गरज काय? या माझ्या प्रश्नाचे सयुक्तिक उत्तर देत नाही. एक संस्कार आहे म्हणून मौंज करणे आवश्यकच असते. असे एक मोघम उत्तर देऊन मोकळे होतात. खरेच आजच्या युगात मौंजेची आवश्यकता आहे का? असल्यास का? मौंज न केल्याने काय फरक पडतो?