झटपट रवा लाडु

  • रवा २ कप
  • डॆसिकेटेड कोकोनट १ कप (सुका नारळ किस)
  • साजुक तुप पाउण कप (आवश्यकते नुसार कमी जास्त)
  • साखर २ कप
  • दुध १/४ कप
  • काजु १५
  • बेदाणे १५
  • ४ हिरवे वेलदोडयाची पुड
  • ४ लवंगाची पुड
२० मिनिटे
  1. ३ टे स्पून तूप नॉनस्टिक पॅन मध्ये गरम करा.
  2. त्या मध्ये रवा घालून हलकासा ब्राऊन रंगावर भाजून घ्या
  3. रवा गार करा.
  4. तुपावर काजू व बेदाणे तळून घ्या. बाजूला ठेवा.
  5. रवा आणि साखर एकत्र मिक्सर मध्ये पावडर करा. बाजूला ठेवा. (साखरे बरोबर रवा दळल्याने रवा बारीक होण्यास मदत होते.)
  6. डेसिकेटेड कोकोनट जरासा नॉनस्टिक पॅन मध्ये शेकुन घ्या. नाही शेकले तरी चालेल. गार झाले की मिक्सर मध्ये फिरवून पावडर करून घ्या.
  7. आता कोकोनट पावडर + रवा पावडर  + लवंग पूड + वेलची पूड चांगली एकत्र करा.
  8. त्यावर दूध शिंपडून मिक्स करा . गरज वाटेल तसेच शिंपडतं राहा.
  9. थोडे थोडे तूप ओतून लाडू होतील का पाहा.
  10. जेव्हा असे वाटेल की लाडूला योग्य अशी कन्सिसटन्सि झाली. की त्याचे लाडू वळा.
  11. प्रत्येक लाडवात एक काजू एक बेदाणा घाला.  १५ मिनिटाने लाडू छान घट्ट होतात.

  • हे लाडू करताना एकदम दूध ओतू नका नाहीतर लाडू वळले जाणार नाहीत. आवश्यकते नुसारच दूध शिंपडा.
  • हे लाडू केरळ मध्ये केले जातात. "सोमय्या पिल्ले" यांची  हि मूळ रेसिपी मी स्वतः: करून पाहिली मला आवडली.
    त्यामुळे इकडे पोस्ट केली. 
  • एरवी आपण लाडू करताना १ तरी पाक तारी लाडू करतो.व ओला नारळ वापरतो. ते तर मस्त चं लागतात. त्यात वादच नाही.
  • पण या सोप्या पद्धतीने केलेले लाडू झटपट तर होतातच शिवाय चवीलाही छान लागतात.
  • प्रसादाला झटपट करण्यास उपयुक्त.

गणपती बाप्पा मोरया!!!

सोमय्या अनिलपिल्ले