दिसलीऽऽ मज दिसली

दिसलीऽऽ मज दिसली
स्वप्नांची सम्राज्ञी ती
मुसमुसती सौंदर्यवती
रसरसलेली ती युवती
हाय रे हाय मज दिसलीऽ - मज दिसली ।ध्रु।

चंचला ती नेईऽऽ हृदय चोरुन माझे
तुजसि बग्गीवाल्या,ऽऽ प्रेमबीम न समजे
थोडी काळ्या रंगाची
अन् तापट स्वभावाची
होती मोठ्या हृदयाची
जी कुणी
मज दिसलीऽ - मज दिसली ।१।
दिसलीऽऽ मज दिसली ...

पदर तनुहुन ढळलाऽऽ झर्कनी ती निघता
उधळली जाय सभाऽऽ ती नटूनी येता
होती ती सौंदर्यखनी
नवथर होती ती रमणी
जणु प्रेम-उखाण्यावाणी
जी कुणी
मज दिसलीऽ - मज दिसली ।२।
दिसलीऽऽ मज दिसली...

स्वप्न आता माझेऽऽ बांधणे तिज कंकण
सर्व माझे जीवनऽऽ तिज करावे अर्पण
दाविन हे मी जगताला
घालिन तिज मी वरमाला
काहि करुन मिळविन तिजला
जी कुणी
मज दिसलीऽ - मज दिसली ।३।
दिसलीऽऽ मज दिसली ...

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच! (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ... काहीही असू द्या. पण कडव्याच्या शेवटच्या ओळीला ध्रुवपदातल्या ओळी मिळत्या जुळत्या हव्यात.