मी चाललो तरीही
मलाच गर्व वाटे
मी "हासलो" तरीही
तिजला प्रसन्न वाटे
मी पाहिले तरीही
त्यांना असभ्य वाटे
मी जिंकिले तरीही
त्यांना असत्य वाटे
केला सवाल तरिही
त्यांचे बोलणेच खुंटे
स्तब्ध राहिलो तरीही
प्रश्न वाढताची वाढे
जाण ठेवली तरीही
जगणे अशक्य वाटे