अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची दखल योग्य आहे का?

अयोध्या प्रकरणात उच्च न्यायालयाचा निकाल घोषित होण्याची तारीख ठरल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्रिपाठींच्या अर्जानंतर हस्तक्षेप करून निर्णय घोषित करण्यास स्थगिती दिली. प्रसिद्धी माध्यमात जे काही प्रसिद्ध झाले त्यावरून चर्चेद्वारे अजूनही अयोध्या प्रकरणात तोडगा निघू शकतो आणि प्रकरणात निर्णय दिला गेल्यास देशातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडू शकते तसेच राष्ट्रकुल स्पर्धा आणि बिहारच्या आगामी निवडणुका बघता निर्णय लांबणीवर टाकावा अशी मागणी करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयाने ती तात्पुरती मान्य केली. एखाद्या प्रकरणात निर्णय दिल्याने शांतता व सुव्यवस्था बिघडू शकते म्हणून निर्णय देणे स्थगित करणे योग्य आहे का? साठ वर्षात तोडगा निघाला नाही तर आता तशी आशा का बाळगावी? कधीही तोडगा निघू शकतो म्हणून न्यायालयातील प्रकरणच बंद करायला काय हरकत आहे? अफजल गुरुची फाशीही अशीच लांबणीवर पडत आहे. न्यायालय हे भय, भ्रष्टाचारमुक्त असावे अशी किमान अपेक्षा आहे. न्यायालयीन भ्रष्टाचाराच्या सुरस कथा अधून मधून बाहेर येतच असतात. आता भय दाखवून निर्णय स्थगित करण्याची किंवा बदलवण्याची पद्धत सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्य वाटत नाही. मनोगतींना काय वाटते?