गजला घरात माझ्या

आल्या सरी प्रमाणे गजला घरात माझ्या
पडला उजेड नसता समईत वात माझ्या
आत्म्यास छेडणाऱ्या तारा आहेत गजला
त्यानी मला शिकविले बघण्यास आत माझ्या
उद्रेक भावनान्चा होताच त्या क्षणाला
कम्पन बनून गजला आकारतात माझ्या
संवाद काळजाशी करतात शेर जेव्हा
गजलेस कोणतीही नसतेय जात माक्ष्या
मुजरा सलाम घेणे मजला पसंत नाही
गजलेस भावनांचा द्या कुर्निसात माझ्या
गजलेमुळे मिळाल्या कित्त्येक प्रेमिका मज
शब्दा मधून देती हतात हात माझ्या
निष्प्राण जीव होता होते अचेत जगणे
गजले सवेच आल्या उर्मी उरात माझ्या
का काफिया अलामत लागून ध्यास आहे?
दुसरी घरात आता होते न बात माझ्या
आले उधाण मजला जेव्हा कुणी म्हणाले
"तो करवाच गजला जातोय गात माझ्या"
गजला किती लिहाव्या ठरवेल कोण सांगा?
निश्वास श्वास गजला या जीवनात माझ्या
"निशिकान्त" सांग आता इछा अखेरची तू
अंत:क्षणी फुलू दे गजला मनात माझ्या