ऑक्टोबर २५ २०१०

ह्यावर लिहिले जायला हवे

पुष्कळदा आपल्याला एखादा विचार सुचतो; पण त्यावर लिहायला वेळ नसतो म्हणा किंवा त्यावर लिहावे इतकी आपली तयारी नसते म्हणा, किंवा इतर कोणी ह्या विषयावर आधीच तयारी केलेली आहे काय ह्याची कल्पना नसते म्हणून म्हणा,  किंवा अगदी वेगळ्याच कारणाने आपल्याकडून ते लिहून होत नाही.

अशा वेळी कोणी दुसऱ्याने त्यावर लिहावे आणि इतरांनी त्यावर चर्चा करावी असे वाटते.

असे असल्यास अशा विषयावर लिहिण्याविषयी येथे प्रतिसादाचे रूपात विनंती करावी.

पर्यायाने समजा आपल्याला काही लिहावेसे वाटत असेल; पण विषय सुचत नसेल, किंवा विषय सुचलेला आहे पण त्या विषयाला नेमके कसे सामोरे गेल्याने ते जास्तीत जास्त लोकांना उपयोगी होईल ह्याची कल्पना नसेल तर तशी चौकशी येथे प्रतिसादाचे स्वरूपात करावी.

प्रशासनाकडे अनेक वेळा अशा प्रकारची चौकशी केली जाते त्यावर आधारित असा हा चर्चाप्रस्ताव आहे.

Post to Feed

माझं लेखन
जागतिक घडामोडी...
वाचायला आवडेल
एक नवीन किंवा वेगळा विचार आहे असे मात्र अनेकदा जाणवते
मला वाटतं मनोगतवर विनोदाचा एक स्वतंत्र भाग हवा
एकदम झक्कास आयडिया!
व्यंगचित्रे, कलादालन
प्रवासवर्णने

Typing help hide