तिळा उघड!

तिळा उघड !
          
अलीबाबाचा खजिन्याची गुहा उघडण्याचा परवलीचा शब्द न आठवल्याने बरीच दारे
आपल्याला उघडता येत नाहीत. अशीच इंग्रजी म्हण सांगते कि "Knock the door
and it shall open unto it" दार ठोठावा उघडेल (कदाचित). पण बरेच वेळा मी
दार ठोठावतच  नाही. दार ठोठावले आणि ते उघले, त्याचा गमतीदार किस्सा.

          १९६५ सालची गोष्ठ ( छोटीशीच हं !). मी मुंबईला M.Tech. (एम टेक ) च्या
दुसऱ्या वर्षात होतो.  नागपूरहून आलेला शरद वेले नुकताच पहिल्या वर्षाला
रुजू झाला होता. त्याला थोडी मुंबई दाखवण्याकरता आम्ही कोटात (fort) गेलो.
भारताच्या प्रवेश द्वाराच्या (Gate way of India) परिसरात भटकत असतांना,
तिथून मला विक्रांत नावाची त्या वेळची विमानवाहू बोट, आरमाराच्या बंदरात
लागलेली दिसली. लगेच ती पहावी असे माझ्या मनाने घेतले व मी शरदला म्हणालो
कि, "चल मी तुला विक्रांत दाखवतो."

        गोदीच्या प्रवेशद्वारात १००/२०० माणसांची झुंबड होती. एक एक माणसाला
प्रवेशिका (pass) पाहून आत सोडीत होते. आता अलिका पंचाईत. "पण तिळा उघड"
करायचे ठरवले. आम्ही थोड पुढे होऊन हवालदाराला आम्हाला  सुरक्षा
अधिकाऱ्याला भेटायचे आहे असे सागितले. त्याने लगेच आम्हाला आत सोडले व
सुरक्षा कार्याकालाकडे इशारा केला.

आम्ही सरळ सुरक्षा अधिकाऱ्यास आम्ही आय आय टी (IIT) चे विद्यर्थी असून विक्रांत पाहण्यास आलो आहेत असे जाहीर केले.

     अधिकारी,  "तुमचे पास कुठे आहेत ?"
         मी, "आमच्याजवळ पास नाहीत.
   अधिकारी, " मग तुम्हाला विक्रांत पाहता येणार नाही."

      
पण आय आय टी चे विद्यार्थी असल्याने "विद्वान सर्वत्र पूज्यते" मानून त्यांनी आम्हाला झटकून टाकले नाही व तिथून हाकलून दिले नाही.  
        मी, "हरकत नाही!  पण आम्हाला इथूनच थोडा वेळ विक्रांत बघू द्या"

     याला
त्यांची ना नव्हती. १५ - २० मिनिटे आम्ही त्यांचे कार्यालयातूनच
विक्रांतचे निरीक्षण केले व मग त्यांचे समोर आरामात स्थानापन्न झालो.

    थोड्यावेळाने त्यांना काय वाटले कुणास ठाऊक, ते म्हणाले आज आम्ही
विक्रांतवरच्या सैनिकांच्या कुटुंबियांना बोट  दाखवत आहोत. त्यापैकी
कुणाबरोबर तरी तुम्हाला पाठवतो. त्यांनी एका तरुण सैनिकाला पकडले व
आम्हाला बरोबर घेऊन जाण्याची विनंती केली. सैनिकांनी आम्हा दोघांना आपाद
मस्तक न्याहाळले व नकार जाहीर केला. कसा नेणार तो आम्हाला? तो त्याच्या २
मैत्रिणींना घेवून आला होता. आम्हा दोन देखण्या (smart) तरुणांना नेणे
म्हणजे संपलेच कि.

   
आम्ही आमच्या तोंडावर एकदम शांत भाव ठेऊन बसलो. आता हा अधिकाऱ्याचा मानाचा
प्रश्न होता. आणि आम्हाला विक्रांत दाखवणे ही सर्वस्वी त्यांची  जबाबदारी
झाली.

    थोड्या वेळाने योगायोगाने, माझा कुलकर्णी नावाचा मित्र, कुणा सैनिकाबरोबर येताना दिसला.
            
मी, "अहो!  यांना मी ओळखतो"
                 अधिकारी, "ठीक आहे!  जा तुम्ही त्यांचे बरोबर".

     मग
तास दोन तास संपूर्ण विक्रांत मनसोक्त पहिली. दोन तीन वेळा आम्हाला नकार
देणारा सैनिक भेटला. त्यानी नजर चुकवली पण मैत्रिणी आमच्याकडे पाहून
हसल्या.

परत जाताना शरद, "वसंता मानला बुवा तुला!"

वसंत बरवे २७ औक्टोबर २०१०