'रानमेवा' काव्यसंग्रह प्रकाशन

'रानमेवा' काव्यसंग्रह प्रकाशन
नमस्कार मित्रांनो,
       माझा ‘रानमेवा’ हा पहिलावहिला काव्यसंग्रह बुधवार दिनांक, १० नोव्हेंबर २०१० ला  शेगाव (जि.बुलढाणा) येथे मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात लाखो शेतकर्‍यांच्या साक्षीने मा.शरद जोशी यांचे शुभहस्ते प्रकाशित होत आहे. आपणही उपस्थित राहून आपले आशीर्वाद द्यावेत, यास्तव हे आग्रहाचे निमंत्रण.
     ११२ पृष्ठे असलेल्या या कविता संग्रहास शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांची प्रस्तावना लाभली असून श्री वामनराव देशपांडे, श्री डॉ. श्रीकृष्ण राऊत, ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ, श्री मुकुंददादा कर्णिक, श्री गिरीश कुळकर्णी, जयश्री कुळकर्णी-अंबासकर, छाया देसाई, डॉ भारत करडक, अलका काटदरे, स्वप्नाली गुजर आणि श्री अनिल मतिवडे यांचे अभिप्राय लाभले असून पुस्तकाची किंमत रू. ६०/- आहे.
* पोष्टाने पुस्तक हवे असल्यास कृपया आपला पोस्टाचा पूर्ण पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर किंवा  कॅम्पस प्रकाशन, आर्वी छोटी त. हिंगणघाट जि. वर्धा या पोष्टाच्या पत्त्यावर पाठवावा.
* 'रानमेवा'’ पीडीएफ स्वरूपात हवे असल्यास आपला ईमेल पत्ता वरील ईमेलवर पाठवावा.
* 'रानमेवा'’ ऑनलाईन स्वरूपात येथे वाचता येईल. http://ranmewa.blogspot.com
धन्यवाद! 
                                         आपला स्नेहांकित
                                           गंगाधर मुटे