नोव्हेंबर २१ २०१०

माझा पहिला काव्यसंग्रह 'शोध मनाचा'

२५/१२/२०१० - सा. ५:३०
२५/१२/२०१० - रा. ८:३०
प्रिय वाचकहो,

माझा पहिला काव्यसंग्रह, 'शोध मनाचा' प्रकाशित करताना मला आनंद होत आहे. वडील धाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने आणि विद्यादेवतेच्या वरद हस्ताने, मी हे धाडस करत आहे. तुम्ही सर्वांनी इंटरनेटच्या माध्यमातून मला खूप प्रोत्साहन दिले आणि त्याची परिणीती आज या प्रकाशनात होत आहे.

डॉक्टर पद्मजा फेणाणी यांनी सुंदर प्रस्तावना लिहिली आहे. त्यांचे मनापासून आभार.
प्रकाशन सोहोळा दिनांक २५ डिसेंबर २०१० रोजी, संध्याकाळी ५:३० वाजता पुणे येथे होणार आहे.

आपण आलात तर मला फार आनंद होईल. (येणार असाल तर कृपया मला mayuresh87@gmail.com या पत्त्यावर कळवा.)

( दुवा क्र. १ )
आपला उदयोन्मुख कवी,
मयुरेश कुलकर्णी

प्रकाशन सोहोळ्याचा पत्ता:
इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे ब्रांच
डॉ. नितू मांडके आय. एम. ए. हाउस,
९९२, शुक्रवार पेठ
पुणे.


Post to Feed
Typing help hide