एक नवी काळजी

पार्श्वभूमी - माझी मुलगी पुढील वर्षी मिडल स्कूल मध्ये जाणार आहे. म्हणजे आताची शाळा बदलून मोठ्या शाळेत प्रवेश करणार आहे.

______

काही दिवसांपूर्वी मुलीच्या शाळेमध्ये पालकांची सभा होती. या सभेमध्ये ही मुलं ज्या "मिडल स्कूल" मध्ये जाणार , त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना आमंत्रीत केले होते. हेतू हा होता की मुख्याध्यापकांनी "मिडल स्कूल" ची माहिती द्यावी आणि पालकांना प्रोत्साहित करावे.

पण झाले भलतेच.  या मुख्याध्यापकांनी सुरुवातीलाच भलताच सूर लावला. त्यांनी भाषणात सांगितले की - आमच्या शाळेत चाकू/सुरे सापडण्याच्या ज्या घटना घडतात, त्यामधील हत्यारे अतिशय लहान असतात. तेव्हा काळजी करण्याचे कारण नाही. इतर शाळांत जास्त मोठे चाकू सापडलेले आहेत.

यावर पालकांना हसावे की रडावे तेच समजेना. हे मुख्याध्यापक घाबरवत आहेत की प्रोत्साहन देत आहेत तेच कळत नव्हते.

अमेरिकेत प्रायव्हेट शाळा अतोनात महाग आहेत. पब्लिक शाळांमध्ये ह्या असल्या समस्या आहेत. प्रायव्हेट शाळांत ह्या समस्या नाहीतच याची शाश्वती नाही पण तेथे सरासरी कमी मुलांमागे एक शिक्षक, वैयक्तिक लक्ष, शिस्त आदि प्लस पॉईंटस आहेत.

काळजीने खूप घोर लागला आहे.